1962 पासून कारगिल युद्धापर्यंत शौर्यगाथा सांगणारे भारतीय हवाई दलात एक से एक शूर पायलट होते आणि आहेतही. स्वातंत्र्यपूर्व काळात असाच एक फायटर पायलट होता ज्याच्या पराक्रमाची कहाणी आजही जगभरात प्रसिद्ध आहे.
ब्रिटीशांच्या अंमलाखाली पहिल्या महायुद्धात लढा देणारा पायलट इंद्रलाल रॉय होता. 2 डिसेंबर 1898 रोजी कोलकाता इथे जन्मलेल्या रॉयच्या सर्व्हिस रेकॉर्डस्नुसार तो एप्रिल 1917 मध्ये रॉयल फ्लाइंग कॉर्प्स साठी काम करत होता. तो ब्रिटीश हवाई दलात रुजू झाला तेव्हा तो केवळ 18 वर्षांचा होता.
ब्रिटनच्या रॉयल फ्लाइंग कोर्प्सच्या वतीने पहिल्या महायुद्धात लढा देत असताना इंद्रलाल रॉयने जर्मन हवाई दल पूर्णपणे नष्ट करून टाकलं. युद्धात इंद्रलालने सुमारे 170 तास उड्डाण केलं.
यादरम्यान, त्याने अवघ्या 14 दिवसांतच 9 फायटर विमानं हवेतच नष्ट केली. जर्मनीशी लढताना तो केवळ 19 वर्षांचा होता. इंद्रलाल रॉयला त्याच्या कामगिरी साठी डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस पुरस्काराने गौरविण्यात आलं. हा पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिला भारतीय ठरला.
लंडनमधील सेंट पॉल स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्याला ही नोकरी मिळाली. 21 सप्टेंबर 1918 रोजी लंडन गॅजेटमध्ये त्याचाबद्दल एक लेख आला. या लेखात, त्याला सर्वोत्कृष्ट आणि निडर पायलटची पदवी देण्यात आली.