देशासाठी मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेंस स्टाफ' पदाची घोषणा

देशासाठी मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेंस स्टाफ' पदाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाच्या सुरक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशभरात आज 73वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याहून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली. देशाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची (Chief of Defence Staff)निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. म्हणजे CDS देशाच्या तिन्ही सैन्यदलांचं नेतृत्व करेलं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलासोबत मिळून आपलं कार्य करेल. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, या नवीन व्यवस्थेमुळे देशाची ताकद आणखी वाढेल.

(वाचा :आदित्य ठाकरेंनी मुहूर्त साधला, विधानसभेआधी कोळी बांधवांच्या भावनांना साद)

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय?

कारगिल युद्धानंतर 2019मध्ये एका उच्चस्तरीय समितीनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. CDS आपल्या कामाचा अहवाल थेट संरक्षण मंत्र्यांना देईल. सध्या भारतात चीफ ऑफ स्टाफ समिती आहे. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अध्यक्षपद सोपवलं जातं. दरम्यान, करण्यात आलेल्या शिफारशींनुसार अखेर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या निर्मितीची घोषणा केली.

(वाचा : पंत तू अशी घेणार का धोनीची जागा? विराटचे भाव सर्वकाही सांगून गेले)

VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या