मुंबई, 15 ऑगस्ट : वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का, याची चर्चा सुरू आहे. अशातच आज नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे यांनी वरळीतील समुद्रात नारळ अर्पण करण्याच्या कोळी बांधवांच्या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला. आदित्य ठाकरे हे गेले काही दिवस वारंवार वरळी विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त उपस्थितीत राहत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त आज शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आदित्य यांनी आवर्जून वरळीतील कोळी समाजाच्या महत्त्वाच्या सणादिवशीच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यामुळे पुन्हा आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे आणि वरळी विधानसभा शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही. पण आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरतील, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मुंबईतील वरळी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि वरळीतील माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्या यांना वरळीतील लढाई सोपी जावी म्हणूनच सचिन अहिर यांना शिवसेनेनं गळाला लावल्याची चर्चा आहे. दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग