Home /News /national /

पिंक सिटीवर 'कोरोना'ची दहशत, जयपूरमध्ये आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ

पिंक सिटीवर 'कोरोना'ची दहशत, जयपूरमध्ये आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ

जयपूरमधील (Jaipur) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) या 2 रुग्णांसह आता भारतातील (India) एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 7 झाली आहे.

    जयपूर, 03 मार्च : पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरवर (Jaipur)  कोरोनाव्हायरसने (Coronavirus)  दहशत निर्माण केली आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. ज्या इटालियन (italian) पर्यटकाला कोरोनाव्हायरस झाला होतो, त्याच्याच पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जयपूरमधील कोरोनाव्हायरसच्या या 2 रुग्णांसह आता भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 7 झाली आहे. भारतातील नवी दिल्ली, तेलंगाणा आणि राजस्थानमध्ये सोमवारी कोरोनाव्हायरसचे एकूण 3 रुग्ण सापडले. जयपूरमध्ये इटलीतील पर्यटकाच्या रक्ताच्या नमुन्याचा मंगळवारी पुण्याहून आलेला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आता त्याच्या पत्नीचा एसएमएस रुग्णालयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेत. कोरोनाव्हायरग्रस्त इटालियन नागरिकांना रुग्णालयात आइसोलेशन वार्डमध्ये (Isolation ward) ठेण्यात आलं आहे. संबंधित - 'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त रुग्णालयापासून 3 किलोमीटरचा परिसर संसर्गाचा धोका असलेला परिसर (containment zone) म्हणून घोषित करण्यात आला. आरोग्य अधिकारी या परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करणार आहेत. दिल्लीतील इटालियन नागरिकांना ITBP कॅम्पमध्ये पाठवलं उत्तर प्रदेशच्या आग्र्यात कोरोनाव्हायरसचे 6 संशयित रुग्ण आहेत, तर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आलेत. यामध्ये 21 इटालियन नागरिक आणि 3 भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसताच त्यांना तात्काळ भारत-तिबेट सीमा पोलीसच्या (ITBP) कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.  एएनआयने (ANI) च्या ट्विटनुसार, “या इटालियन नागरिकांमध्ये 13 महिला, 8 पुरुष आहेत. तर एक भारतीय टुरिस्ट गाइड, एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर आहे. या सर्व लोकांच्या चाचणीचा अहवाल बुधवारी येणार आहे.” संबंधित - तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव इराणहून नुकताच भारतात परतलेल्या एका आर्मी ऑफिसरलाही कोरोनाव्हायरस झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील महूतल्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये isolation वॉर्डमध्ये या अधिकाऱ्याला दाखल केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या