नवी दिल्ली, 2 जून : कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे चीनने मंगळवारी मोठा दावा केला आहे. भारतातील चीनी राजदूत सन वेडॉंग यांनी म्हटले आहे की, चीनच्या वुहानमध्ये गेल्या दोन आठवड्यांत सुमारे 10 दशलक्ष लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी करण्यात आली. परंतु या काळात कोविड 19 संसर्गाचा एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. या कालावधीत 300 लोकांमध्ये लक्षणं नसल्याचे समोर आले आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कांवर आलेल्या 1174 लोकांनाही अलग ठेवण्यात आले आहे. वुहान हे कोरोना विषाणूचे मूळ मानले जाते. या रूग्णांमध्ये ताप, खोकला किंवा घसादुखी यांसारखी लक्षणे आढळली नाहीत परंतु तरीही त्यांना तपासणीत संसर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार चीनमध्ये 15 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) म्हटले आहे की, सोमवारी देशाबाहेरुन आलेले पाच लोक संसर्गित असल्याचे आढळले. त्याच वेळी 10 लोक कोणतीही लक्षणांशिवाय संसर्गित असल्याचे आढळले. आयोगाने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणतीही लक्षणांशिवाय संक्रमित झालेले 371 लोकांपैकी 39 परदेशातून आलेले आहेत. हे सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. हे वाचा- लॉकडाऊनमध्ये काय करायचं? बाप-लेकाने विहीर खोदून पाण्याची समस्या केली दूर ‘निसर्ग’ चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







