अखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी!

अखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी!

पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून हे सैनिक मागे हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 9 जून: भारत आणि चीन (India-China) दरम्यान पूर्व लद्दाख (Eastern Ladakh) जवळच्या ताबा रेषेवर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला तणाव निवळायला सुरुवात झालीय. चीनच्या दबावाला न झुकता भारताने ठाम भूमिका घेतल्याने अखेर चीनलाच झुकावं लागलं. या भागातल्या तीन ठिकाणांवरून चीनने आपलं सैन्य अडीच किलोमीटर मागे बोलावलं आहे. याच मुद्यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याने त्याचा परिणाम झाला असून चीनने सैन्याला माघारीचा आदेश दिला आहे.

पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून हे सैनिक मागे हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती. यात भारताचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरींदर सिंग यांनी केलं. चीनच्या दबावाला भारताने भीक घातली नसून भारत आपल्या अधिकार क्षेत्रात कुठलीही लुडबूड सहन करणार नाही असं सिंग यांना चीनी अधिकाऱ्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या असलेल्या नियंत्रण रेषा आणि ताबा रेषा धुडकावत चीन अतिक्रमण करत जमीनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

हे वाचा - चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतानं केला मास्टर प्लान, जपानसोबत करणार मोठा करार

लद्दाख जवळच्या सीमेजवळ चीनने गेल्या काही दिवसांमध्ये दंडेली केली होती. चीनचे सैनिक अतिक्रमण करत भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारीही झाली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती.

हे वाचा -भारताबाबत वैज्ञानिकाचा दावा ठरतोय खरा, जुलैमधील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी

भारत-पॅसिफिक प्रदेशातील चीनच्या विस्तारवादी वर्तनावर भारताने सातत्याने निरीक्षण केलं आहे. हे लक्षात घेऊन भारताने चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. संपूर्ण हिंद महासागर प्रदेशपर्यंत (आयओआर) आपली रणनीतिक आणि नौदल कार्यवाहीचा विस्तार वाढविण्यासाठी समविचारी देशांशी लष्करी करार करीत आहे.

यासाठी आता जपानसोबत लष्करी करार करण्याची तयारी भारत करीत आहे. यामुळे चीनला हिंद महासागर क्षेत्रात कचाट्यात पकडण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी होणार आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 9, 2020, 8:43 PM IST

ताज्या बातम्या