लडाख, 17 जून : भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Commanding Officer of the Chinese Unit involved in the face-off with Indian troops in the Galwan Valley among those killed: Sources confirm to ANI pic.twitter.com/MWbEUZezba
— ANI (@ANI) June 17, 2020
गलवात खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर त्याचा निषेध करण्यासाठी अनेक भागांमध्ये मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले. या हिंसाचारात जखमी झालेल्या 4 जवानांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं. संपादन- क्रांती कानेटकर