मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO पाहून तुमचीही मान शरमेने खाली जाईल! महिला इमारतीवरून उडी मारत होती आणि...

VIDEO पाहून तुमचीही मान शरमेने खाली जाईल! महिला इमारतीवरून उडी मारत होती आणि...

डिंपल वाडिलाल हिच्या आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे.

डिंपल वाडिलाल हिच्या आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे.

डिंपल वाडिलाल हिच्या आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 3 जानेवारी : इमारतीवरून उडी मारून 40 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील चारकोप या भागात घडली आहे. डिंपल वाडिलाल असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. चारकोप भागातील रॉक एनक्लेव या इमारतीत गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली.

आत्महत्या केलेली महिला ही आईसोबत राहात होती. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही महिला प्रचंड तणावात होती. कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे ही महिला तणावात गेली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 'लग्न न झालेल्या डिंबलला काही महिन्यांपासून कोणता जॉबही मिळत नव्हता. त्यामुळे ती तणावात होती,' अशी माहिती डिंपल वाडिलाल हिच्या आईने पोलिसांना दिली आहे.

वडिलांनी PubG डिलीट केल्याने तरुणीने फोडला हंबरडा, 6 लाख लोकांनी पाहिला VIDEO

दरम्यान, डिंपल वाडिलाल हिच्या आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत डिंपल ही आधी इमारतीच्या टेरेसवर उभी राहिलेली दिसत आहे. नंतर ती इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यावेळी खाली असणार काही लोक चक्क व्हिडिओ काढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वाढलेल्या प्रभावामुळे लोकांच्या संवेदना हरवत चालल्या आहेत का, असा प्रश्न वारंवार समोर येतो. मुंबईतील या व्हिडिओमध्येही एक महिला आपला जीव देत असताना काही लोक मात्र व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात असलेले दिसत आहे.

First published: