अलीकडेच एरिक सोल्हेम यांनी त्याच्या ट्विटरवरून उत्तराखंड या अतिशय सुंदर राज्याचं एक सुंदर छायाचित्र शेअर केलं आहे. हा फोटो पौरी, गढवालचा आहे. चित्रात हा परिसर खरोखरच स्वर्गासारखा सुंदर दिसत आहे. या फोटोला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशातील शिमलाचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्यांनी या फोटोसोबत लिहिलं की, हे युरोपमधील शहर नसून सुंदर आणि हिरवाईने भरलेल्या शिमल्याचा फोटो आहे. हा फोटो लोकांना खूप आवडला.
एरिक सोल्हेम यांनी यापूर्वी उत्तराखंडमधील नैनितालचा फोटो शेअर केला होता. हा फोटो रात्री खूप उंचावरून घेतला होता आणि तलावाच्या काठावर चमकणाऱ्या नैनितालचं दृश्य असं दिसत होतं की, जणू काही जमिनीवर तारेच विखुरले आहेत.
एरिक यांनी शेअर केलेला तामिळनाडूचा फोटोही पाहण्यासारखा आहे. त्यांच्या वर्णनानुसार, हे ठिकाण कोली हिल्स आहेत, जे तामिळनाडूच्या नमक्कल येथे आहेत. इथले डोंगरावर बांधलेले नागमोडी वळणावळणांचे रस्ते हेअरपिनसारखे सुंदर दिसतात.
नॉर्वेजियन डिप्लोमॅटने दक्षिणेकडील सुंदर मंदिर देखील पाहिलं आणि त्याचा फोटो शेअर केला. भारतात 1800 वर्षांपूर्वी 3D उत्कृष्ट कृती होत्या असं त्यांनी म्हटलंय. हा फोटो तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिराचा आहे.
याशिवाय एरिक यांनी राजस्थानचा एक सुंदर फोटो शेअर करताना या राज्याचंही वर्णन केलं आहे. भारतातील लोकांना त्यांची पोस्ट आवडलीच आहे. शिवाय, भारतीय पर्यटनाला चालना देण्याच्या त्यांच्या पद्धतीचं कौतुकही केलं जात आहे. (All Photos Credit- Twitter/Erik Solheim)