Home /News /national /

कोरोना पुन्हा येतोय! मुंबईसह नोएडा आणि दिल्लीत वाढले रुग्ण, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कोरोना पुन्हा येतोय! मुंबईसह नोएडा आणि दिल्लीत वाढले रुग्ण, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Corona Update: मुंबईत (Mumbai) बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. शहरात कोरोनाचे 73 नवीन रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या 17 मार्च 2022 नंतरची सर्वाधिक आहे.

मुंबई, 15 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) जगभर हाहाकार माजवला. या आजाराचा फटका भारतालाही बसला आणि त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. या दोन वर्षांत कोरोनाचे अल्फा, डेल्टा, डेल्टाप्लस, ओमिक्रॉन (Omicron), XE असे अनेक व्हेरियंट्स आढळले. भारतात काही महिन्यांपूर्वी तिसरी लाट (Corona Third Wave) येऊन गेली. तिसरी लाट फारशी गंभीर नव्हती. त्यामुळे ही लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. परिणामी, काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी निर्बंध हटवले. सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत आणि निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होत आहेत. पण याचदरम्यान कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसतंय. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1007 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात कोरोना बाधितांची (Covid 19 patients in India) संख्या 11,058 झाली आहे. भारतात 80 दिवसांनी पहिल्यांदाच काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, भारतातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये XE व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळले होते. त्यानंतर नवीन रुग्णांची नोंद नाही. दरम्यान, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या वाढत्या केसेस आणि नवीन व्हेरियंट XE संबंधी विषयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नवीन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. कोरोना महामारी (Corona Pandemic) अद्याप संपलेली नाही, असा इशारा देत मंत्री मनसुख मांडविय यांनीही कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. देशात Corona च्या चौथ्या लाटेचा धोका वाढला?, केंद्र सरकार निर्बंधांची घोषणा करण्याची शक्यता राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. शहरात कोरोनाचे 73 नवीन रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या 17 मार्च 2022 नंतरची सर्वाधिक आहे. मुंबईत कोविड प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, असं बीएमसीकडून सांगण्यात आलंय. अलीकडेच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गाझियाबाद आणि नोएडातील (Noida and Ghaziabad) दोन-दोन शाळांमध्ये मिळून कोरोनाचे 19 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 13 जण नोएडातील खेतान शाळेत आहेत. विद्यार्थ्यांसह तीन शिक्षकदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर, नोएडातील DPS शाळेत एक विद्यार्थी संक्रमित आढळला होता. गाझियाबादच्या सेंट फ्रान्सिस शाळेत आणि कुमारमंगलम शाळेत एकूण 5 जण पॉझिटिव्ह आहेत. कोरोना संक्रमण अधिक पसरू नये यासाठी तिन्ही शाळा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. XE व्हेरियंटबद्दल एक्सपर्ट काय म्हणतात? मुंबईतील खार येथील हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमधील क्रिटिकल केअर सल्लागार, डॉ. भरेश देधिया म्हणाले, ‘XE हायब्रिड स्ट्रेन आणि बाकीच्या व्हेरियंटमध्ये कोणताही वैद्यकीय फरक नाही. नवीन सब-व्हेरियंट XE ची सर्व लक्षणं Omicron सारखीच सौम्य आहेत. XE व्हेरियंट येऊन जवळपास 3 महिने झाले आहेत आणि Omicron प्रमाणे जगभरात पसरलेला नाही. त्यामुळे हा वेगळा व्हेरियंट नसून ओमिक्रॉनसारखाच आहे, असं म्हणता येईल.’ नाश्ता न दिल्यानं भडकला सासरा; सुनेला दिला भयंकर मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक घटना डॉ. सचिन कंधारी (Dr Sachin Kandhari) सीनियर न्यूरोसर्जन आणि व्यवस्थापकीय संचालक, आयबीएस हॉस्पिटल, दिल्ली यांच्या मते, या नवीन प्रकाराबद्दल अद्याप फारशी माहिती नाही. हा ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो. परंतु, डेल्टासारखा तीव्र नाही. हा व्हेरियंट सौम्य असला तरी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ नये म्हणून काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. “गेल्या काही आठवड्यांत XE व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप त्याबाबत संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. नुकत्याच आलेल्या कोविड प्रकरणांच्या गांभीर्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की तो डेल्टासारखे धोकादायक नाहीत. त्यांची ट्रान्समिसिबिलिटी ओमिक्रॉनपेक्षा जास्त नक्कीच असू शकते. नवीन व्हेरियंट आढळण्यातून एक गोष्ट अधोरेखीत होते की, संपूर्ण जगात चांगल्या प्रकारे लसीकरण झालेले नाही. एकीकडे आतापर्यंत एक तृतीयांश लोकसंख्येला लसीचा पहिला डोसदेखील मिळालेला नाही, तर दुसरीकडे यूएस दुसऱ्या बूस्टरची तयारी करत आहे,” असं डॉ. सचिन म्हणाले. दरम्यान, 18 वर्षांवरच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस देण्याची घोषणा सरकारने केली. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना हा डोस मोफत दिला जात आहे. अन्य प्रौढ व्यक्तींना या डोससाठी शुल्क द्यावं लागणार आहे. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवरही देण्यात येईल. ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांनी लशीचा दुसरा डोस 9 महिन्यांपूर्वी घेतला होता, त्यांनाच हा प्रीकॉशन डोस देण्यात येत आहे.
First published:

Tags: Corona updates, Health, Omicron

पुढील बातम्या