मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी! 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना लवकरच मिळणार कोरोना लस? आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

मोठी बातमी! 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना लवकरच मिळणार कोरोना लस? आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस (vaccination for all above age of 45 ) देण्यात यावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) केंद्रासमोर मांडला आहे.

45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस (vaccination for all above age of 45 ) देण्यात यावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) केंद्रासमोर मांडला आहे.

45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस (vaccination for all above age of 45 ) देण्यात यावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) केंद्रासमोर मांडला आहे.

नवी दिल्ली, 17 मार्च: देशभरात कोरोनाचे रुग्ण (Corona Cases in India) वाढत असताना एक आनंदाची बातमी समोर येते आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस (vaccination for all above age of 45 ) देण्यात यावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) केंद्रासमोर मांडला आहे. दरम्यान या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास लवकरच 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्यात येईल.

महाराष्ट्रानंतर (Maharashtra) देशातील अन्य राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची परिस्थिती (Coronavirus in India) गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सोबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीमध्ये नव्या  निर्बंधासह कोरोना संदर्भात घ्यावयाच्या अनेक निर्णयांवर चर्चा झाली. याच बैठकीमध्ये आरोग्य मंत्रालयाकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला.

(हे वाचा-दुपारी 1 नंतर नाही मिळणार किराणा अन् भाजीपाला, मनपा आयुक्तांचे महत्त्वाचे आदेश)

कोरोना व्हॅक्सिनेशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये (Corona Vaccination Drive) आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी अशा फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली होती. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या अन्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. देशभरामध्ये सध्या लसीकरणाचा हा दुसरा टप्पा सुरू आहे.

सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या झालेल्या बैठकीत, या राज्यांनी मास्क वापरण्याची आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोहिमेचं कठोरपणे पालन करण्याचे आदेश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहे. शिवाय येणाऱ्या काळात जे काही कार्यक्रम असणार आहेत, ज्याठिकाणी गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona hotspot, Corona vaccination, Covid19