रिओ दि जानेरो, 1 जून : ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असलेल्या 5 महिन्यांच्या मुलीने कोरोना व्हायरसला मात दिली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. अनेकजण तर ही बाब चमत्काराहून कमी नसल्याचे म्हणत आहेत. 5 महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी एका महिन्यांपासून कोमामध्ये होती. असे असूनही ती यातून सुखरुप बाहेर आली. मुलीच्या आई-वडिलांसाठीही ही बाब चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे ते म्हणतात. ते म्हणाले की, एखाद्या नातेवाईकाला भेटायला गेल्यानंतर मुलीला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. या बाळाचे नाव डोम आहे. तिला रिओ दि जानेरो प्रो कॉर्डिको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर जवळपास 54 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. ती बरी झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. ब्राझीलमध्ये 12 महिन्यांपर्यंतच्या 25 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू सीएनएनशी बोलताना मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे की, आपल्या मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांना हा एक प्रकारचा जिवाणूचा संसर्ग असल्याचे वाटले. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दिवसेंदिवस तिची प्रकृती अधिकच वाईट होत चालली होती. यानंतर मुलीचे वडील आणि त्यांच्या पत्नीने मुलीला दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे मुलीची कोरोना टेस्ट झाली. ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील कोरोना विषाणूचे केंद्र बनले आहे. येथे कोरोनामुळे आतापर्यंत 12 महिन्यांच्या मुलांचे 25 मृत्यू झाले आहेत. देशाच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत 5 लाख 14 हजार 849 जणांना विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली आहे. या विषाणूमुळे 29 हजार 300 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे वाचा- मुंबईच्या या एका भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला 3000 चा टप्पा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.