जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाच्या संकटात 'हे' राज्य झालं मालामाल, सापडला 120 कोटींचा खजिना

कोरोनाच्या संकटात 'हे' राज्य झालं मालामाल, सापडला 120 कोटींचा खजिना

कोरोनाच्या संकटात 'हे' राज्य झालं मालामाल, सापडला 120 कोटींचा खजिना

प्रत्येक राज्य सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असताना एक राज्य असे आहे, जे एवढ्या मोठ्या संकटात मालामाल झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जमशेदपूर, 05 जून : भारत सध्या अनेक संकटांशी दोनहात करत आहे. अशात अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. प्रत्येक राज्य आर्थिक अडचणींचा सामना करत असताना एक राज्य असे आहे, जे एवढ्या मोठ्या संकटात मालामाल झालं आहे. सध्या या राज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील एका शहरात 250 किलो सोन्याचा साठा सापडला आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक जनार्दन प्रसाद आणि संचालक पंकज कुमार सिंह यांनी राज्याचे खाण सचिव अबुबाकर सिद्दीकी यांना खाणीतील सोन्याच्या साठ्याबाबत अहवाल सादर केला आहे. येथील बिंदारी खाणीमध्ये 250 किलो सोन्याचा साठा सापडला असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. वाचा- सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच, असे आहेत आजचे दर झारखंड सरकारनं आता या खाणीच्या लिलावाची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 120 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. पंकज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली बिंदारदरीतील सोन्याचे साठे शोधण्याचं काम सुरू होते. त्यात वेगवेगळ्या आणि चांगल्या प्रकराचं सोने आहे. वेगवेगळ्या जातींच्या सोन्याच्या धातूंचे 250 किलो सोनं बाहेर काढण्यात आलं आहे. वाचा- सावधान! 1 लाख भारतीयांच्या Aadhaar, PAN आणि पासपोर्टचा इंटरनेटवर लागला सेल राज्यात आणखी सात ठिकाणी आहेत सोन्याच्या खाणी जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार झारखंडमध्ये सोन्याच्या आणखी खाणी असण्याची शक्यता आहे. यापूर्वी लावा, कुंडारकोचा, पहाडीडीहा आणि पारशी इथं सोन्याचे साठे सापडले आहेत. राज्यात आणखी सात ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. रांची ते तामार दरम्यान सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बर्‍याच ठिकाणी स्वर्णरेखा नदीच्या वाळूमधून  सोन्याचे कण फिल्टर करण्याचे कामही सुरू आहे. वाचा- नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात