Home /News /money /

Gold Rates Today 4th June : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच, असे आहेत आजचे दर

Gold Rates Today 4th June : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच, असे आहेत आजचे दर

आज 22 कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतचं सोनं स्वस्त झालं. तर, चांदीचे दरही (Silver Prices Today) 655 रुपये प्रति किलोग्रामनं कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 04 जून : एकीकडे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आणि अनलॉक 1.0मध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. आज सराफा बाजारात सोन्यांचे दर सलग दुसऱ्या दिवशी घसरले (Gold-Silver Price Today 4th june 2020). आज 22 कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतचं सोनं स्वस्त झालं. तर, चांदीचे दरही (Silver Prices Today) 655 रुपये प्रति किलोग्रामनं कमी झाले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती अशा प्रकारे आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राममध्ये 404 रुपये घसरण झाली. त्यामुळं आज सोन्याची किंमत प्रति भाव तोळा 46 हजार 441 रुपये आहे. तर चांदी 655 रुपयांनी घसरूण तिचे दर 47 हजरा 640 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचबरोबर 23 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 402 रुपयांनी घसरण झाली आहे. याचबरोबर 23 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 255 रुपयांवर आली आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 370 रुपयांनी घसरून 42 हजार 540 किंमत झाली आहे. या किंमती जीएसटीसह नाही आहेत. वाचा-नोकरी जाण्याचं टेन्शन आता विसरा, लॉकडाऊनमध्ये हे काम करून लाखो कमवा वायदे बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या असल्या तरी वायदे बाजारात मात्र किंमती वाढल्या आहेत. वायदा बाजारात प्रति दहा ग्रॅममागे 52 रुपयांनी वाढ होऊन सोन्याची किंमत 46 हजार 060 झाली आहे.एमसीएक्समध्ये ऑगस्ट महिन्यात डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 52 रुपयांनी किंवा 0.11 टक्क्यांनी वाढून 46 हजार 060 रुपये प्रति 10 ग्राम झाले आहेत. वाचा-600 विदेशी कंपन्या चीनमधून भारतात येण्याची शक्यता, सरकारची चर्चा सुरू सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी 1. सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते. 2. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू. भविष्यात काय राहणार सोन्याच्या किंमती? जगभरात झालेल्या अनेक रिसर्च अहवालांच्या मते सोन्यामध्ये पुढील काही महिन्यामध्ये गुंतवणूक कायम राहील. पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत 54000 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वाचा-सावधान! 1 लाख भारतीयांच्या Aadhaar, PAN आणि पासपोर्टचा इंटरनेटवर लागला सेल
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या