30 मे : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. लखनौच्या सीबीआय न्यायालयानं हा जामीन मंजूर केला. कोर्टात दाखल होण्यापूर्वी अडवाणी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस इथे भेट घेतली. 1992 मध्ये बाबरी विध्वंसच्या वेळी कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पण ते आता राज्यपाल असल्याने त्यांना खटल्यातून सुटका मिळालीय. याशिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल,आचार्य गिरिराज किशोर यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावं या खटल्यातून वगळण्यात आलीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.