मराठी बातम्या /बातम्या /देश /CBSE 10th Result 2021: दहावीचा निकाल आणखी पुढे ढकलणार? समोर आली महत्त्वाची माहिती

CBSE 10th Result 2021: दहावीचा निकाल आणखी पुढे ढकलणार? समोर आली महत्त्वाची माहिती

आता CBSE दहावीच्या निकालाबाबत एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता CBSE दहावीच्या निकालाबाबत एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता CBSE दहावीच्या निकालाबाबत एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 13 जुलै: कोरोनामुळे (Corona) CBSE आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या (MH State Board) दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. त्यात आता विशेष मूल्यांकन पद्धतीनं CBSE लवकर दहावी आणि बारावीचे (CBSE 10th and 12th Results) निकाल लावणार आहे. मात्र आता CBSE दहावीच्या निकालाबाबत एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. CBSE दहावी निकाल या आठवड्यात लागणार होता मात्र आता हा निकाल काही कारणांमुळे पुढे ढकलण्याची (CBSE 10th result date) शक्यता वर्तवण्यात येत आहे.

CBSE दहावीचा निकाल 20 जुलै तर बारावीचा निकाल (CBSE 12th Result date) 30 जुलै ला घोषित करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं मात्र या निकालाच्या मूल्यांकन पद्धतीबाबत अजूनही बोर्ड संशोधन करत आहे. त्यामुळेच दहावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.

टॅब्युलेशन धोरणाबाबत (Tabulation Policy) अजूनही गोंधळ कायम आहे. ज्या शाळांमध्ये कोणताही जुना डेटा नव्हता त्यांनी आपल्या समस्या मंडळाकडे मांडल्या आहेत. CBSE दहावीचा निकाल तयार करण्यासाठी टॅब्युलेशन पॉलिसी वापरली जात आहे. ज्या शाळांमध्ये जुना डेटा नाही अशा शाळांना जिल्ह्याच्या कामगिरीच्या जोरावर निकाल तयार करावा लागणार आहे. बर्‍याच शाळांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि यापेक्षा चांगल्या मूल्यांकन पद्धतीची मागणी केली आहे.

हे वाचा - 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; सांगली डाक विभागात पदभरती

मूल्यांकनाविरोधात याचिका

CBSE दहावीच्या निकालाच्या धोरणाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयातही (Delhi High Court) दाखल करण्यात आली आहे. जर याचिका कोर्टानं मान्य केली तर मंडळाला निकाल जाहीर करण्याची तारीख पुढे जाणायची शक्यता आहे.

बारावीचा निकाल वेळेत

CBSE दहावीचा निकाल जरी पुढे ढकलला जाण्याची शक्यता असली तरी CBSE बारावीचा निकाल मात्र वेळेतच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. CBSE बारावीचा निकाल 30 जुलै 2021 पर्यंत लागण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: CBSE, Exam result, Ssc board