नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान WHO (World Health Organization) नं भारत (India) देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan)म्हणाल्या की, भारतात कोविड -19 भारतात काही प्रकारच्या स्थानिक स्थितीत (Stage of endemicity) प्रवेश करत आहे.
पुढे स्वामीनाथन म्हणाल्या की, जिथे व्हायरसचा प्रसार कमी किंवा मध्यम पातळीवर आहे. प्रत्यक्षात स्थानिक पातळीचा टप्पा उद्भवतो तेव्हा देशाची लोकसंख्या व्हायरससह जगणं शिकून जाते. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा हा टप्पा खूप वेगळा आहे.
कोव्हॅक्सिनला मंजुरी देताना शास्त्रज्ञ म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की WHOचा टेक्निकल ग्रुप कोव्हॅक्सिनला त्याच्या अधिकृत लसींपैकी एक म्हणून मान्यता देण्यास समाधानी असेल आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हे होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; शहरासह उपनगरात या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
सौम्या स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, भारतातील लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, कोरोना संसर्गाची परिस्थिती अशीच सुरू राहणे खूप शक्य आहे. तसंच देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत चढ -उतार होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus