मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; शहरासह उपनगरात या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; शहरासह उपनगरात या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai water Supply News: मुंबईसह उपनगरांत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनवर नवीन पंपिग सेट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांत चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 ऑगस्ट: मुंबईसह उपनगरांत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाइनवर नवीन पंपिग सेट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांत चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर संकुलातील पंपिंग स्टेशनमध्ये 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित उदंचन केंद्र बंद राहणार आहे. त्यासाठी गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

संबंधित कालावधीत संपूर्ण पश्चिम उपनगर, शहर भागातील एफ/ दक्षिण परळ-लालबाग, एफ/उत्तर शीव, वडाळा, माटुंगा वगळून सर्व विभाग आणि पूर्व उपनगरातील एल विभाग कुर्ला व एन विभाग घाटकोपरमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. खरंतर, मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील काही भागात सातत्यानं पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील मुंबई 3-अ उदंचन केंद्रामध्ये 80 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसवण्यात येणार आहे.

हेही वाचा-Mumbai: काळजी वाढवणारा निकाल! genome sequencing मध्ये सापडले डेल्टाचे 128 रुग्ण

हा पंपिंग सेट बसवण्यापूर्वी 900 मिलिमीटर व्यासाची  एक नवीन झडप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई 3-अ उदंचन केंद्र गुरुवार सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी दरम्यानच्या काळात मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

हेही वाचा-इच्छुक उमेदवारांनो, कामाला लागा, महापालिका निवडणुकांचा अखेर मुहूर्त ठरला

दरम्यानच्या काळात भांडुप संकुलास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुप संकुलतून पश्चिम उपनगरे आणि शहरातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर भाग वगळून सर्व विभागात तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Mumbai