पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान! 'दारू' प्यायल्याने गेला 728 जणांचा बळी

पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान! 'दारू' प्यायल्याने गेला 728 जणांचा बळी

तब्बल 5000 जणं ही 'दारू' प्यायले होते. अनेक पालकांनी आपल्या मुलांनाही ही दारू प्यायला दिली होती.

  • Share this:

तेहरान, 28 एप्रिल : एका अफवेमुळे इराणमध्ये (Iran) 728 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील हजारो लोक एका अफवेवर विश्वास ठेवून इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले होते. यामध्ये 728 जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये एक अफवा पसरली होती. अल्कोहोल प्यायल्याने कोरोना संसर्गावर (Coronavirus) नियंत्रण आणता येते. ज्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले होते. इराणच्या सरकारने याबाबत खुलासा केला आहे. सोमवारी इराण सरकारने सांगितल्यानुसार या घटनांमध्ये 728 जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणमधील मृतांबाबत माहिती देणाऱ्या कार्यालयाकडून ही  माहिती समोर आली. त्यांनी सोमवारी सांगितले की, इंडस्ट्रियल अल्कोहोल पिणाऱ्यांच्या घटनांमध्ये 728 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शेकडो जणांच्या दृष्टीवरही परिणाम झाला आहे. तर अनेकांची दृष्टी गेली आहे.

5000 जण प्यायले मिथेनॉल

इराण आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता कियानौश जहापौर यांनी सांगितले की, तब्बल 5011 जणांनी या अफवेतून इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायली होती. अनेक पालकांनी आपल्या मुलांनाही ही दारू प्यायला दिली. यापैकी 90 जणांची दृष्टी गेली आहे. अफवेनंतर अनेक जण दारू शोधत नाही. ती मिळाली नाही म्हणून अनेकजण मिथेनॉल प्यायले. गेल्या अनेक दिवसांपासून इराणमध्ये सोशल मीडियावर याबाबत अफवा पसरली होती. मात्र अशाप्रकारे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे इराण सरकारकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित -महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; शेकडो मजुरांचा आक्रोश

कोरोनाला संपवण्यासाठी देशात पहिला मोठा प्रयत्न, राज्य सरकारचे उचलले पाऊल

 

First published: April 28, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या