राकेश मैती, प्रतिनिधी
हावडा, 28 मार्च : आपल्या देशात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. तसेच अनेक मान्यताही सांगितल्या जातात. यातच पश्चिम बंगालमध्ये एका तलावाबाबत अनोखी आख्यायिका सांगितली जाते. हावड्यातील एका तलावात स्नान केल्याने अनेक आजार बरे होतात. त्यामुळेच हावडा आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक या तलावात स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात, अशी मान्यता आहे. या तलावाची ख्याती लोकांमध्ये बऱ्याच काळापासून पसरली आहे आणि बंगालमधील लोक त्याला बातुल पुकुर (मोटा तलाव) या नावाने ओळखतात.
असे म्हणतात की, या तलावात कमळाची फुले आणि मोठे मासे आढळत होते. आता या तलावात स्नान करण्यापूर्वी पूजा केली जाते. पारंपारिकपणे, लोक त्यांच्या घरून तेल, हळद, कुंकू आणि तांदूळ आणतात आणि तलावाच्या बाजूला असलेल्या झाडाला अर्पण करतात. असे केल्यावर आणि हळदीला हात लावल्यानंतरच लोक आंघोळीसाठी तलावावर जातात.
या बातुल पुकुरच्या तीरावर देवी चंडीचे मंदिर आहे. स्नान करून भाविक देवीची पूजा करतात. असे केल्याने सर्व रोग संपतात अशी लोकांची श्रद्धा आहे. लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यावर ते पुन्हा येथे पूजा करण्यासाठी येतात. माता चंडीची कृपा भक्तांवर होते, असे मानले जाते. त्यामुळे आजही या तलावात स्नान आणि पूजा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात,
शुक्ल पक्षात रविवारी तलावाजवळ पूजेच्या वस्तू मिळतात. या दिवशी येथे लोकांची मोठी गर्दी असते. लोक चंडीची पूजा करतात. आंघोळीनंतर ते तलावातील पाणी एका भांड्यात भरून आणतात. तलावात आंघोळ केल्यावर दोन दिवस घरी या तलावाच्या पाण्याने स्नान करावे, असा नियम आहे.
पुजेदरम्यान अनेक प्रकारची वाद्येही वाजवली जातात. चंडीच्या पूजेत भोपळा, गोड भोपळा खास अर्पण केला जातो. याशिवाय मीठही अर्पण केले जाते. निभा सरकार या भाविक म्हणाल्या, “या तलावाविषयी या भागातील लोकांकडून ऐकल्यानंतर मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे आली आहे. मला आशा आहे की, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.”
भारीच! 30 वर्षांपासून कुत्र्यांना जगवणारा श्वानप्रेमी, पदरमोड करुन करतोय रोजचा खर्च!
तसेच बातुल पुकुरच्या मंदिराशी संबंधित तपन सरकार म्हणाले, “या तलावात स्नान केल्याने अनेक आजार दूर होतात. या तलावात आंघोळ केल्याने विशेषत: महिला व बालकांचे त्वचारोग बरे होतात. अनेक लोक त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी या तलावात आंघोळ करण्यासाठी येतात आणि असे झाले तर असे लोक पुन्हा इथे पूजा करायला येतात.”
तर स्थानिक रहिवासी माणिक लाल डे म्हणाले, “लोकांची चंडी देवीवर श्रद्धा असली पाहिजे. देवी चंडीचे स्मरण करून या तलावात स्नान केल्यावर दुबळे लोक लठ्ठ होतात, असे मानले जाते. म्हणूनच या तलावाला 'मोटा पुकुर' म्हणतात. येथे येणाऱ्या लोकांच्या सुविधा लक्षात घेऊन अनेक पावले उचलण्यात आली आहेत. घाटाच्या समोर चंडीदेवीच्या मंदिराशिवाय सावित्री आणि सत्यवानाची मंदिरे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.