वाराणसी, 20 ऑगस्ट : गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून देशभरात कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातल्या बहुतांश भागात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. अजूनही काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना तज्ज्ञ आणि सरकारकडून दिल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेदरम्यान लोकांना अनेक तांत्रिक त्रुटींचा सामना करावा लागला. लस न घेताच लसीकरणाचा मेसेज येणं, बूस्टर डोस न घेताच तो घेतल्याचा मेसेज येणं असे प्रकार काही ठिकाणी दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत (Varanasi) सध्या असाच प्रकार पाहायला मिळत आहे. या प्रकाराची सध्या वाराणसीत जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असून, या मंत्राला अनुसरून देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतर आता बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचं काम वेगानं सुरू आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत लोकांना बूस्टर डोस न घेताही तांत्रिक बिघाडामुळे (Technical Error) लसीकरणाबाबतचा मेसेज येत आहे. जर तुमच्यासोबत असा प्रकार घडला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. ``तक्रार व्यवस्थापन युनिटद्वारे ही समस्या सोडवली जाऊ शकते आणि त्यानंतर बूस्टर डोस घेता येऊ शकतो,`` अशी माहिती वाराणसीचे सीएमओ डॉ. संदीप चौधरी यांनी दिली आहे. किडनी विकाराची ही आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम अशी करा तक्रार ही समस्या दूर करण्यासाठी लाभार्थी cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. या वेबसाईटवरील तक्रारीविषयींचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय वाराणसी आरोग्य विभागाने जारी केलेल्या diovns@gmail.com या मेल आयडीवर किंवा 9415820479 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तांत्रिक बिघाडामुळे जाणवतेय समस्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नव्हे तर तांत्रिक त्रुटींमुळे ही समस्या उद्भवत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आता आरोग्य विभागाने ही पावलं उचलली आहेत, असा दावा वाराणसी आरोग्य विभागाने केला आहे. या त्रुटी तत्काळ दूर होऊन, लोकांना बूस्टर डोस घेता येणं गरजेचं आहे. परंतु, या समस्येतून लोकांची कशी आणि कधी सुटका होणार हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.