मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

किडनी विकाराची ही आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम

किडनी विकाराची ही आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम

किडनी विकार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणं दिसून येतात.

किडनी विकार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणं दिसून येतात.

किडनी विकार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणं दिसून येतात.

मुंबई, 20 ऑगस्ट : किडनी (Kidney) हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातले अनावश्यक घटक युरिनच्या माध्यमातून बाहेर टाकण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या काही वर्षांत किडनीशी संबंधित आजाराचं प्रमाण वाढलं आहे. किडनीशी संबंधित विकारांचं सामान्यतः अ‍ॅक्यूट आणि क्रोनिक अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. किडनी विकार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणं दिसून येतात. काही वेळा या लक्षणांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे वयोगटानुसार लक्षणं समजून घेणं आवश्यक आहे. आहार-विहारात योग्य बदल केल्यास किडनी विकार (Kidney Disease) टाळता येतात किंवा नियंत्रणात येऊ शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. किडनीशी संबंधित विकार, त्याची लक्षणं आणि सामान्य उपाययोजनांविषयी गुरुग्राम येथील सी. के. बिर्ला रुग्णालयाचे प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. मोहित खैरबत यांनी रुग्णालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या ब्लॉगमध्ये मार्गदर्शन केलं आहे. किडनी विकार काहीसा दुर्लक्षित पण सर्व वयोगटातल्या लोकांना होऊ शकतो. एकूण सामान्य लोकसंख्येपैकी जवळपास 14 टक्के लोक क्रॉनिक किडनी डिसीजचा सामना करत आहेत. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या (National Kidney Foundation) मते, ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या तुलनेत मृत्यूसाठी सीकेडी (Chronic Kidney Disease -CKD) जास्त जबाबदार असल्याचं दिसून येतं. असं असतानाही किडनीशी संबंधित आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. किडनी ही दोन बियांच्या आकाराचा अवयव असून तो तुमच्या बरगडीच्या खाली पोटाच्या मागच्या बाजूला असतो. शरीरातले विषारी घटक (Toxic substances) काढून टाकणं, अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं, मूत्रनिर्मिती करणं आणि खनिज तसेच द्रवाचं संतुलन राखण्याचं काम किडनी करते. किडनी खराब झाल्यास शरीरातल्या फिल्ट्रेशन सिस्टिमवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे शरीरात अनावश्यक घटक, विषारी घटकांचं प्रमाण वाढून मळमळ, अशक्तपणा, झोप न लागणं, दम लागणं यासारख्या समस्या उद्भवतात. अ‍ॅक्यूट (Acute) आणि क्रॉनिक हे किडनी विकाराचे दोन प्रकार आहेत. अचानक कोणताही आजार किंवा आघात झाल्यास अ‍ॅक्यूट किडनी डिसीज होतो. काही कारणांमध्ये किडनीतील रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय येणं, किडनीला दुखापत किंवा तिच्यावर आघात होणं यांचा समावेश होतो. हे वाचा - मुक्या जीवामुळे महिलेला पुनर्जन्म! झोपेतच आला होता Heart attack; मांजरीने असा वाचवला तिचा जीव ``क्रॉनिक किडनी डिसीज हळूहळू होतो. डायबेटिस (Diabetes) आणि हायपरटेंशनही (Hypertension) या प्रकारच्या किडनी विकारासाठी महत्त्वाची कारणं ठरतात,`` असं डॉ. खैरबत यांनी सांगितलं. किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी चार उपचार पर्याय उपलब्ध आहेत. शेवटच्या टप्प्यातील किडनी विकार असेल तर किडनी ट्रान्सप्लांट (Kidney Transplant) हा पर्याय गरजेचा ठरतो. या उपचार पद्धतीत डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे तुमची खराब झालेली किडनी काढून टाकतात आणि तिच्या जागी निरोगी डोनरची किडनी बसवतात. डायलिसिस (Dialysis) ही एक प्रगत उपचार पद्धती आहे. ज्यात तज्ज्ञ डॉक्टर एका मशीनच्या सहाय्याने तुमच्या रक्तातले विषारी आणि अनावश्यक घटक फिल्टर करतात. डायबेटिस आणि उच्च रक्तदाब हे किडनी विकारासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे डॉक्टर तुमचं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध घेण्याचा सल्ला देतात. जर तुमचा किडनी विकार बळावलेला नसेल तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. यासाठी डॉक्टर तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारण्यास तसेच त्यात काही बदल करण्याचा सल्ला देतात. किडनी विकाराची काही लक्षणं महत्त्वाची असतात. त्यामुळे या लक्षणांकडं दुर्लक्ष करू नये. जर तुमची किडनी नीट काम करत नसेल तर तुमच्या शरीरात विविध खनिजं (Minerals) आणि प्रथिनं (Protein) जमा होतात. यामुळे डोळ्या खालचा भाग फुगल्या सारखा दिसतो. तसेच क्रॉनिक किडनी डिसीज हा डायबेटिस आणि उच्च रक्तदाबामुळे होतो. यात तुमच्या डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि दृष्टीशी समस्या उद्भवू लागतात. किडनी विकाराच्या सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे फेसयुक्त युरिन होय. जेव्हा तुमची किडनी खराब होते, तेव्हा मूत्रमार्गाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रथिनं बाहेर पडतात. हे प्रथिनं फेसयुक्त आणि बुडबुड्यांच्या रुपात युरिन वाटे बाहेर पडतात. हे वाचा - Ganesh Rudraksha : तुमच्या मुलांना जरूर घाला गणेश रुद्राक्ष; होतात 'हे' फायदे किडनी विकार असता स्नायूंशी संबंधित त्रास जाणवतो. स्नायू आखडल्यासारखे (Cramp) किंवा पिळवटून गेल्यासारखे वाटतात. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने शरीरातल्या द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्चे नियमन होत नाही. त्यामुळे क्रॅम्पिंगचा त्रास होतो. कॅल्शियम आणि फॉस्फरसची पातळी कमी होणं यासारखे घटक या लक्षणाचे प्रमुख कारण असते. त्वचा कोरडी पडणं आणि खाज सुटणं हे किडनी विकाराचं लक्षण मानलं जातं. क्रॉनिक किडनी डिसीज किंवा शेवटच्या टप्प्यातील किडनी विकार असता, त्याची लक्षणं त्वचेवर दिसून येत असल्याचं त्वचा विकार तज्ज्ञ सांगतात. यामुळे 40 टक्के रुग्ण प्रभावित आहेत. त्वचा कोरडी पडणं (Dry Skin) आणि खाज सुटणं हे खनिज आणि हाडांच्या आजाराशी संबंधित लक्षण आहे. जे बहुतेकदा किडनी विकार असलेल्या लोकांमध्ये आढळते. किडनी विकार असलेल्या रुग्णाच्या शरीरातून जास्त द्रव (Fluid) बाहेर पडू शकत नाही. हे द्रव शरीरात साठून राहते. अतिरिक्त द्रव पदार्थ साचल्याने पायांना आणि घोट्याला सूज येऊ लागते. त्यामुळे हे देखील किडनी विकाराचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. किडनी खराब झाल्याने शरीरात विविध प्रकारचे विषारी पदार्थ साठून राहतात. त्यामुळे रुग्णाच्या खाण्याच्या सवयी आणि भूकेवर परिणाम होतो. सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणून अनेक लोकांना (शेवटच्या टप्प्यातील किडनी विकार असलेल्या सुमारे 10 टक्के लोकांना) भूक न लागणे ही समस्या जाणवते. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने विशेषतः रात्रीच्यावेळी युरिन होण्याचं प्रमाण वाढतं. रात्रीच्या वेळी युरिनला जाण्याची इच्छा होणे अर्थात नोक्टुरिया (Nocturia) हे किडनी विकाराचे प्रमुख लक्षण आहे. क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या अंदाजे 64 टक्के रुग्णांमध्ये नॉक्टुरिया हे सामान्य लक्षण पाहायला मिळते. हे वाचा - मुक्या जीवामुळे महिलेला पुनर्जन्म! झोपेतच आला होता Heart attack; मांजरीने असा वाचवला तिचा जीव युरिन मधून रक्त पडणे (Blood) हे किडनी विकाराचे एक लक्षण मानले जाते. विषारी घटक फिल्टर करणं हे किडनीचं प्रमुख काम असतं. या प्रक्रियेत रक्त पेशी आरक्षित केल्या जातात. पण किडनीचं कार्य बिघडले तर काही रक्त पेशी लीक होतात आणि त्या युरिनद्वारे बाहेर पडतात. किडनीचे कार्य आणि झोप यांचा जवळचा संबंध आहे. झोपेच्या पॅटर्नचा (Sleep Pattern) परिणाम किडनीच्या आरोग्य आणि कार्यावर होतो. नॅशनल किडनी फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, झोप आणि झोपेतून जागे होण्याच्या चक्रावर तुमच्या किडनीचं कार्य नियंत्रित होतं. किडनी 24 तास कार्यरत असते आणि झोपेचं चक्र तसेच कार्यभार सुसंगत करण्यास मदत करते. क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये झोपेचे विकार दिसून येतात. रात्री झोप न येणं, दिवसा झोप येणं, रात्री शांत झोप न लागणं ही किडनी विकाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. किडनी विकार असलेल्या रुग्णांमध्ये थकवा हे लक्षण सर्वसामान्य मानलं जातं. अ‍ॅडव्हान्स क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या सुमारे 87 रुग्णांच्या एका लहान क्रॉस सेक्शनल अभ्यासात तीव्र थकवा (Fatigue) हे किडनी विकाराचं प्रमुख लक्षणं म्हणून नोंदवलं गेलं आहे. जेव्हा तुमची किडनी क्षमतेनुसार काम करणं थांबवते तेव्हा तुमच्या शरीरात विषारी आणि अनावश्यक घटक जमा होऊ लागतात. यामुळे थकवा जाणवू लागतो. अशा वेळी शरीरात ऊर्जा कमी होते. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या म्हणण्यानुसार, थकवा हे नैराश्याचं लक्षण आहे. अ‍ॅडव्हान्स रिनल डिसीजमध्ये हे सामान्यतः दिसून येतं. हे वाचा - Ganesh Rudraksha : तुमच्या मुलांना जरूर घाला गणेश रुद्राक्ष; होतात 'हे' फायदे ``शरीराच्या दोन्ही बाजूला, मधल्या बाजूला किंवा कंबरेच्या वरच्या भागात किडनीशी निगडीत वेदना जाणवू शकतात. काही वेळा या वेदना ओटीपोट आणि मांडीच्या सांध्यापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी पाठदुखी हे किडनी विकाराचे लक्षण आहे का असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. या प्रश्नाचे उत्तर होय असू शकते. काही विशिष्ट आरोग्य स्थितीमुळे पाठ किंवा कंबरेच्या भागात किडनी विकाराने वेदना होऊ शकतात. अशा वेळी नेफ्रोलॉजीस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे,`` असं डॉ. खैरबत यांनी सांगितलं.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या