Home /News /national /

'मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू'; रिक्षात आपला संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट

'मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू'; रिक्षात आपला संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट

गेल्या अनेक वर्षात मुंबईत राहून रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या परप्रांतियांसमोर आता गावी परतण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    इंदूर, 11 मे : कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याचा रोजगारावर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी स्वत:च आणि कुटुंबाचं पोट कसं भरायचं हा त्याच्यासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. परिणामी अनेक चालक रिक्षामध्ये आपला संसार भरुन गावी निघाले आहेत. गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने रिक्षाचालक गावाच्या दिशेने रवाना होत आहेत. इंदूर बायपास रोडवर एक सामाजिक संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या भोजनशाळेत काम करणारे स्वयंसेवक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, प्रत्येक तासाला तब्बल 50 ऑटो रिक्षा या रस्त्यावरुन जातात. यातील अधिकतर मुंबईत रिक्षा चालविणारे आहेत. अधिकतर रिक्षाचालक हे मुंबई ते आग्र्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-तीन याचा वापर करीत मध्य प्रदेशातून जात आहेत. मध्य प्रदेशातील या मुख्य शहराच्या बायपास रोडवर काळी-पिवळी रंगाची रिक्षांची मोठी रांग लागलेली दिसत आहे. या रिक्षात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी आणि महिला, लहान मुलांना सोबत घेऊ गावाकडे जात असल्याचे दिसत आहे. यावेळी भोजनशाळेत पुरी-भाजी घेण्यासाठी आलेले बालेश्वर यादव (54) म्हणाले, ‘मी गेल्या 12 वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवतो. मात्र कोरोना व्हायरसमुळे सध्या तेथे सर्व बंद आहे. मी तब्बल 2 महिन्या आपल्या साठवलेल्या पैशातून घर चालवू शकलो. मात्र आता माझ्याकडे पैसे संपले आहेत आणि गावी परतण्याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग नाही. गावी गायी-म्हशी पाळेन आणि शेती करून स्वत:चं आणि कुटुंबाचं पोट भरेन' इंदूर बायपास रोडवर इंधन भरून घेण्यासाठी रिक्षाची मोठीच्या मोठी रांग लागली आहे. तर काहींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रिक्षाचालक भाडं घेऊन प्रवाशांना उत्तर प्रदेश व दरम्यानच्या भागात सोडत आहेत संबंधित-पत्नी झोपेत असताना डोक्यात घातली कुऱ्हाड, नंतर पोलीस ठाण्यात जाऊन दिला जबाब
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या