नवी दिल्ली, 11 जानेवारी : काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यातच लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनू शकतो, असं ते म्हणाले. असं असलं तरी याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं. सरकारच्या आदेशाची वाट पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग आहे, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलं होतं. त्यावर लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले, संसदीय प्रतिज्ञेनुसार जम्मू-काश्मीर हा अखंड भारताचा भाग आहे. संसदेची ही इच्छा असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. सरकारने आम्हाला आदेश दिला तर योग्य कारवाई करू, असंही त्यांनी सांगितलं.
राजनीतिक नेतृत्व द्वारा PoK को भारत में शामिल करने की टिप्पणी पर सेना प्रमुख: एक संसदीय संकल्प है कि संपूर्ण जम्मू-कश्मीर भारत का हिस्सा है। यदि संसद यह चाहती है, तो उस क्षेत्र (PoK) को भी भारत में होना चाहिए। जब हमें इस बारे में कोई आदेश मिलेंगे, तो हम उचित कार्रवाई करेंगे। pic.twitter.com/qTVzFlVZeN
— ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2020
भारताचं लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहे, असं मनोज नरवणे म्हणाले. नियंत्रण रेषेवरच्या घुसखोरीबद्दल ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणांचं काम आणि लष्कराचा तत्परता यामुळे पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांना मागे हटवण्यात आम्हाला यश येतंय. तिन्ही सैन्यदलांचं एकत्रीकरण हे सरकारने उचललेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे सुरक्षादलं त्यांच्या कामगिरीत यशस्वी ठरतील, असंही मनोज नरवणे यांनी म्हटलंय.
LoC पर पाकिस्तान सेना और आतंकियों के खतरे पर आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवाणे: LoC बेहद सक्रिय है। रोजाना खुफिया अलर्ट प्राप्त होते हैं और उन्हें बहुत गंभीरता से देखा जाता है। इस सतर्कता के कारण, हम BAT के नाम से जाने जानी वाली इन क्रियाओं को विफल करने में सक्षम रहे हैं। pic.twitter.com/5LrvJuCy8L
— ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2020
राज्यघटनेप्रती आमची निष्ठा आहे, घटनेमधली न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व याच मूल्यांचा आम्हाला आदर आहे, असंही ते म्हणाले. भविष्यातल्या युद्धांसाठी लष्कराची जय्यत तयारी करणं, नेटवर्क सक्षम करणं ही आमची उद्दिष्टं आहेत. चीनकडून असलेल्या आव्हानांबद्दल ते म्हणाले, आम्ही उत्तरेकडच्या सीमांवर असलेल्या आव्हानांना प्रतिकार करायला तयार आहोत. आधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने आम्ही या सीमांवर देखरेख करतो आहोत, असंही मनोज नरवणे यांनी सांगितलं. =============================================================================