Home /News /national /

भारत-चीन सीमेवरील IES अधिकारी बेपत्ता; घरात सुरू आहे लग्नाची तयारी

भारत-चीन सीमेवरील IES अधिकारी बेपत्ता; घरात सुरू आहे लग्नाची तयारी

तीन महिन्यांपासून ते लडाखमधील संरक्षण मंत्रालयात सिव्हिल इंजिनिअर म्हणून ते तैनात आहेत

    बलरामपूर, 24 जून : भारतीय अभियांत्रिकी सेवेतील अधिकारी सुभान अली यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. यूपीच्या बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी सुभान अली भारत-चीन सीमेवर रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांची जिप्सी अनियंत्रित झाली आणि सुमारे पाच हजार फूट खोल खड्ड्यात पडली. लष्कराच्या अधिकाऱ्यांना त्यांची जिप्सी सापडली आहे, पण अद्याप सुभान यांचा पत्ता लागलेला नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आयईएस सुभान जुलैमध्ये लग्न करणार होते. घरात  लग्नाची तयारी केली जात होती. त्यांचा भाऊ शबन म्हणाले की, एप्रिलच्या सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती, पण लॉकडाऊनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. हे वाचा-लज्जास्पद! भररस्त्यात गळा चिरुन पत्नीची हत्या, जमाव VIDEO करीत विचारत होता... सुभान अली हे तीन महिन्यांपूर्वीपासून लडाख येथे तैनात होते. ते बलरामपूर जिल्ह्यातील कोवापूर शहर परिसरातील जयनगरा गावचे रहिवासी आहेत. रमझान अली यांचा 28 वर्षीय मुलगा सुभान अली सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. नागरी अभियांत्रिकी व्यापारात 24 वा क्रमांक मिळवलेल्या सुभान यांना सुरुवातीला दिल्ली विकास प्राधिकरणात सिव्हिल इंजिनिअर म्हणून नियुक्त केले गेले होते. तीन महिन्यांपासून ते लडाखमधील संरक्षण मंत्रालयात सिव्हिल इंजिनिअर म्हणून ते तैनात होते. सध्या सुभान अलींची ड्यूटी कारगिल परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. हे वाचा-रुग्णवाहिकेने मागितले अवाच्या सव्वा पैसे; आईचा मृतदेह नेण्यासाठी आली ही वेळ भारत-चीन सीमेवर रस्ता बांधकामाची पाहणी करण्यासाठी सुभान अली गेले होते.  'हिंदुस्तान' च्या वृत्तानुसार, भारत-चीन सीमेवर मीना मार्गापासून द्रासपर्यंत रस्ता तयार करण्यात येत आहे. सुभान सोमवारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांची जिप्सी अनियंत्रित झाली आणि खोल दरीत कोसळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सुभानची जिप्सी शोधली आहे, पण सुभान सापडले नाही.  
    First published:

    Tags: India china border

    पुढील बातम्या