हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती येथील काझा येथे आइस हॉकी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आलं आहे. हे शिबीर 24 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिबिरात 395 मुलांची नोंदणी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक मुलांची नोंदणी झाली आहे. शिबिराची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे.
शिबिरात मुलांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आलेलं असून राष्ट्रीय प्रशिक्षक अमित आईस हॉकीचे बारकावे मुलांना शिकवत आहे.
येथे प्रथमच ही राष्ट्रीय स्पर्धा होणार असल्याची माहिती युवा व क्रीडा सेवा विभाग काझाचे इन्चार्ज सकलजंग दोरजे यांनी दिली आहे.
त्यामुळं आता तरूणाईचं आईस हॉकी खेळाकडं रुची वाढत असल्याचं यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलं.
16 जानेवारी 2022 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धेत पाच ते सात संघ सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक संघात 22 खेळाडू असतील.