हाथरस, 2 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर प्रशासनाच्या व्यवहारामुळे देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह 123 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल व प्रियांका गांधी यांच्याविरोधात 48 पानी एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हाथरस जात असताना नियमांचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन राग व्यक्त केला आहे. आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांनी काही ओळी शेअर केल्या आहेत.
‘मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा... मैं किसी के अन्याय के समक्ष झुकूं नहीं, मैं असत्य को सत्य से जीतूं और असत्य का विरोध करते हुए मैं सभी कष्टों को सह सकूं।’
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 2, 2020
गाँधी जयंती की शुभकामनाएँ।#GandhiJayanti
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करीत तिला अत्यंत क्रुरपणे जीवे मारण्यात आलं. यानंतर देशभरातून उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. दरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडविण्यात आलं. हाथरस येथे 144 जमावबंदी लागू करण्यात आल्याने पुढे जाता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी एकटे जातील अशी विनंती केल्यानंतरही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर धक्काबुक्की केली. हे ही वाचा- ‘आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले’, उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडली. या धक्काबुक्कीत ते खाली पडले. यानंतर देशभरात योगी सरकारवर व तेथील व्यवस्थेवर राग व्यक्त केला जात आहे. मात्र तरीही राहुल गांधी तेथून जाण्यात तयार नव्हते. अशातच राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याविरोधात 78 पानी एफआयआर दाखल करण्यात आलं असून यामध्ये काँग्रेसच्या 153 कार्यकर्ते व नेत्यांची नावे आहेत. याशिवाय 50 अज्ञात लोकांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.