जाहिरात
मराठी बातम्या / देश / '52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही..' राहुल गांधी रायपूर अधिवेशनात भावुक; सोनियांचेही पाणावले डोळे

'52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही..' राहुल गांधी रायपूर अधिवेशनात भावुक; सोनियांचेही पाणावले डोळे

राहुल गांधी रायपूर अधिवेशनात भावूक

राहुल गांधी रायपूर अधिवेशनात भावूक

नवा रायपूर येथे काँग्रेसच्या 85व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रायपूर, 26 फेब्रुवारी : छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या 85व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी पक्षाचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी घर आणि आई सोनिया गांधी यांच्या आठवणी सांगताना राहुल भावूक झालेले पाहायला मिळाले. राहुल यांचे भाषण ऐकताना सोनिया गांधी देखील डोळ्यातील अश्रू लपवू शकल्या नाहीत. मायलेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय म्हणाले राहुल गांधी? “मी आईजवळ गेलो आणि विचारलं? आई काय झालं? आई म्हणाली आपण घर सोडतोय. त्यावेळी पहिल्यांदा आईने मला सांगितलं की आपल्याकडे घर नाहीय. हे सरकारचं घर आहे. 52 वर्षे झाली, माझ्याकडे घर नाही. अजूनही माझ्याकडे घर नाही. आमच्या कुटुंबाचं जे अलाहाबाद येथील घर आहे. ते देखील माझं नाहीय. आई पुढे बसली आहे. मी लहान होतो. 1977 सालची गोष्ट आहे. निवडणूक आली. मला निवडणुकीविषयी जास्त माहिती नव्हतं. मी सहा वर्षांचो असेल. एक दिवस आमच्या घरी अस्वस्थ वातावरण होतं. मी आईला विचारलं आई काय झालं? आई म्हणाली आपण घर सोडतोय. तोपर्यंत मला वाटायचं की हे घर आमचं आहे. मी म्हटलं आई आपण घर का सोडतोय? त्यावेळी मला समजलं की आमच्याकडे स्वतःच घर नाहीय. मी विचारलं आता कुठे जायचं? म्हणाली माहिती नाही. त्यावेळी मी हैराण झालो होतो.” हे बोलताना राहुल भावूक झालेले पाहायला मिळाले. तर समोर बसलेल्या सोनिया गांधी यांचेही डोळे पाणावले.

जाहिरात

‘सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेत नाहीत’ सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होत नाहीत, हे प्रतिनिधींना आणि देशाला कळवायचे आहे, असेही अलका लांबा म्हणाल्या. रायपूरमध्ये पक्षाच्या 85 व्या महाअधिवेशनाला संबोधित करताना सोनिया गांधी शनिवारी म्हणाल्या होत्या, ‘2004 आणि 2009 मध्ये आमच्या विजयाबरोबरच डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाने मला वैयक्तिक समाधान दिले, पण मला सर्वात जास्त आनंद आहे की, माझी कारकीर्द मी ‘भारत जोडो यात्रे’ने संपवू शकले. वाचा - अजित पवारांच्या सीएमपदावरून लंकेंचा घुमजाव आता म्हणतात शरद पवार कुटुंबप्रमुख… भारत जोडो यात्रेसाठी सोनिया गांधींनी मानले आभार सोनिया गांधी म्हणाल्या की, ही भेट काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट म्हणून आली आहे. भारतातील लोकांना सौहार्द, सहिष्णुता आणि समानता हवी आहे हे सिद्ध झाले. या भारत जोडो यात्रेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्या म्हणाल्या, “या (यात्रेने) जनसंपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा पक्ष आणि जनता यांच्यातील संवादाच्या समृद्ध वारशाला नवा आकार दिला आहे. काँग्रेस जनतेच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्यासाठी लढण्यास तयार आहे हे यावरून दिसून आले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

माजी काँग्रेस अध्यक्षांनी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांचे आणि देशातील जनतेचे आणि त्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘मी विशेषतः राहुलजींचे आभार मानते, ज्यांच्या दृढनिश्चयाने आणि नेतृत्वाने यात्रेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात