Home /News /national /

हायड्रोक्लोरोक्विन की रेमडेसिवीर... कोणतं औषध कोरोनावर प्रभावी?

हायड्रोक्लोरोक्विन की रेमडेसिवीर... कोणतं औषध कोरोनावर प्रभावी?

रेमडेसिवीर (Remdesivir) आणि हायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) यापैकी कोणतं औषध कोरोनाव्हायरवर प्रभावी आहे, याबाबत CSIR ने माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 05 मे : संपूर्ण जग कोरोनाव्हायरशी (Coronavirus) लढतं आहे. या व्हायरसचा नाश करेल असं औषध नाही. मात्र उपलब्ध असलेल्या इतर औषधांचा या व्हायरसवर कसा परिणाम होतो याबाबत प्रयोग केले जात आहेत. अशीच काही औषधं वापरून उपचार केले जात आहेत. त्यात आता हायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) आणि रेमडेसिवीर (Remdesivir) औषध कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इन्डस्ट्रिअल रिसर्चचे (Council of Scientific & Industrial Research - CSIR) डायरेक्टर डॉ. शेखर सी मांडे यांनी रेमडेसिवीर आणि हायड्रोक्लोरोक्विन यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत माहिती दिली आहे. डॉ. शेखर सी. मांडे म्हणाले, या दोन्ही औषधांमध्ये सध्या तुलना करणं योग्य नाही कारण रेमडेसिवीरला यूएसमध्ये अतिशय गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही औषधांचे सध्या ट्रायर सुरू आहे, त्यामुळेदेखील त्यांची तुलना करू शकत नाही. त्यामुळे आता तरी कोणतं औषधं चांगलं आहे आणि कोणतं नाही हे सांगू शकत नाही. हे वाचा - शर्थीचे प्रयत्न, कोरोनाची लस तयार करण्यासाठी तब्बल 100 संशोधन गटांकडून काम सुरू याआधी इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) सांगितलं होतं की,  अँटिव्हायरल औषध रेमडेसिवीर कोरोना उपचारावर फायदेशीर ठरू शकतं. एबोला संक्रमणावेळी या औषधाचा वापर करण्यात आला होता. आयसीएमआरचे संचालक डॉ. रमन गंगाखेडकर यांनी संकेत दिले होते की, जागतिक आरोग्य संघटनेमार्फत सुचवण्यात आलेल्या या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलवर लक्ष ठेवलं जात आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - World Asthma Day : अस्थमा अटॅक टाळण्यास मदत करतील 'हे' पदार्थ
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या