Home /News /national /

सिमकार्डची तस्करी करणाऱ्या चिनी गुप्तहेरानं केला मोठा खुलासा

सिमकार्डची तस्करी करणाऱ्या चिनी गुप्तहेरानं केला मोठा खुलासा

सीमा सुरक्षा दलाने चीनच्या हुबेई प्रांतातील निवासी हान जुनवे (35) (Chinese man Han Junwei) याला अटक केली आहे. दरम्यान आता जुनवे यानं आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

    नवी दिल्ली, 13 जून: पश्चिम बंगालमध्ये भारत-बांगलादेश बॉर्डर (International border along West Bengal) अवैध पद्धतीने पार करण्याचा प्रयत्न करीत असताना एका चीनच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की, आपल्या साथीदारांसोबत मिळून तब्बल 1300 भारतीय सिम कार्ड चीनला घेऊन गेला आहे. सीमा सुरक्षा दलाने चीनच्या हुबेई प्रांतातील निवासी हान जुनवे (35) (Chinese man Han Junwei) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान आता जुनवे यानं आणखी एक मोठा खुलासा केला आहे. सिम कार्डची तस्करी करण्याव्यतिरिक्त जुनवे यानं भारतात आणखी एक मोठा गैर व्यवसायाचं जाळं पसरून ठेवलं होतं. हान जुनवे यांच्याशी संबंधित आणखी मोठंमोठे धक्कादायक खुलासे उघड होत आहेत. हान यानं दिल्लीतल्या गुरुग्राममध्ये (80 room hotel in Gurgaon) भागात आपला एक 80 खोल्याचं हॉटेल सुरु केले होतं. या भागात होतं 80 खोल्याचं हॉटेल हान जुनवे व्यवसायाच्या कारणानं भारतात यायचा आणि भारतातून गुप्त माहिती चीनला पाठवायचा. दरम्यान आता एक मोठा खुलासा झाला आहे. जुनवे यानं गुरुग्राममधील DLF भागात स्टार स्प्रिंग नावाचं हॉटेल सुरु केलं होतं. या हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात रेस्टारंटपासून स्पा सेंटरमध्ये सर्व सुविधांची सोय करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये 80 खोल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास 5 ते 6 वर्षांपासून गुरुग्राममध्ये राहार हान सुरुवातीला डीएलएफ फेज 3 मध्ये एक 30 खोल्याचं पीजी चालवायचा. हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात ज्योतिरादित्य सिंधियांना मिळणार 'हे' मंत्रिपद हान जुनवे अटकेत सीमा सुरक्षा दलाने चीनच्या हुबेई प्रांतातील निवासी हान जुनवे (35) याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पश्चिम बंगाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याला बीएसएफच्या टीमने गुरुवारी माल्दा जिल्ह्यातून अटक केली होती. कोलकत्ता मुख्‍यालयातील बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरने याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी दिल्यानुसार, जुनवे हा एक गुन्हेगार राहिला आहे. त्याने चौकशीदरम्यान हैराण करणाऱ्या बाबी सांगितल्या. त्याने अवैध कागदपत्रांच्या साहाय्याने तब्बल 1300 भारतीय सिमकार्ड येथून चीनमध्ये नेले आहेत. कशी करीत असे तस्करी? मिळालेल्या माहितीनुसार, 'जुनवे आपल्या साथीदारांच्या मदतीने अंडरगारमेंटमध्ये सिम कार्ड लपवत होता. हे सिम चीनमध्ये पाठवले जात होते. सिमच्या मदतीने लोकांना फसवणं, पैसे उकळणे हा हेतू होता. या मोठ्या गुन्हेगाराची अटक बीएसएफसाठी मोठं यश मानलं जात आहे. त्याच्यावर आरोप आहेत की, या सिम कार्डचा वापर बँक खाती हॅक करण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापरली जातात. जुनवे याने अधिकाऱ्यांना सांगितलं की, नुकताच लखनऊच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आपला व्यवसाय भागीदार सन जिआंग याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला भारतीय व्हिसा मिळू शकला नाही. तो भारत-बांगलादेश सीमेवरुन आपल्या देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या