पानीपत, 12 फेब्रुवारी : हरयाणातील (Haryana News) पानीपत जिल्ह्यात शनिवारी सकाळी एक मोठा अपघात घडला. तरुणीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. ज्यात तिचा मृत्यूही झाला. तरुणी रेल्वे ट्रॅक क्रॉस (Railway Track) करून ड्यूटीवर जात होता. तिने इयरफोन लावले होते. ती मोठ्या आवाजात गाणं ऐकतं होती. यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. मात्र तिला आवाज आला नाही आणि गरीबरथने तिला धडक दिली. या अपघातात तरुणीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर काही वेळ तिचा श्वास सुरू होता. मात्र स्थानिक तिला रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सिव्हील रुग्णालयात तरुणीचा पंचनामा करीत शवगृहात मृतदेह ठेवण्यात आला. बीकॉमपर्यंत झालं होतं शिक्षण, आधार सेवा केंद्रात नोकरी करीत होती.. मिळालेल्या माहितीनुसार, जोगिंद्रने सांगितलं की, ती मूळत: मध्य प्रदेशात राहणारी आहे. गेल्या तब्बल 25 वर्षांपासून तिचे वडील पानीपतमधील काबडी रोडवर राहत होते. तिचे वडील भाजी विक्री करतात. त्यांना चार मुलं आहेत. दोन मुली आणि दोन मुलं. मुलगी मोनिका (21 वर्षे) बीकॉमपर्यंक शिक्षण झालं होतं. ती एका आधार सेवा केंद्रात नोकरी करीत होती. गेल्या पाच महिन्यांपासून ती येथे नोकरी करीत होती. हे ही वाचा-धक्कादायक! गर्भवती महिलेच्या डोक्यात ठोकला 2 इंचाचा खिळा, कारण वाचून उडेल थरकाप वडिलांनी सांगितलं की, मोनिका दररोज घरातून साधारण 9 वाजता कामासाठी निघते. ती नेहमी पुलाच्या खालून जायची. मात्र त्या दिवशी ती पुलाच्या वरून ट्रॅक क्रॉस करून ऑफिसला जात होती. यात तिचा निष्काळजीपणाच होता. यातच तिचा मृत्यू झाला. जूनमध्ये आहे मोठ्या बहिणीचं लग्न... वडिलांनी सांगितलं की, मोनिकाची मोठ्या बहिणीचं लग्न जून महिन्यात होणार आहे. ज्याची जोरात तयारी सुरू होती. ती दररोज लग्नाबाबत चर्चा करीत होती. लग्नात भरपूर डान्स करीन असं ती वारंवार बहिणीला सांगायची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Haryana, Train accident