Home /News /national /

बॅट डोक्यात घालून केला पत्नीचा खून, हत्येनंतर स्वत:च पोलिसांना केला फोन आणि...

बॅट डोक्यात घालून केला पत्नीचा खून, हत्येनंतर स्वत:च पोलिसांना केला फोन आणि...

पळून जाण्याऐवजी आरोपीने स्वत: पोलीस स्टेशनला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी आरोपीच पोलिसांकडे पोहचला.

    रेवाडी (हरियाणा), 16 जुलै : हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची डोक्यात बॅट घालून हत्या केली. त्यानंतर स्वत: पोलिसांना फोन करून हत्येबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर घराच्या गच्चीवर त्यांना महिलेचा मृतदेह आढळला. ही घटन पहाटे चारच्या सुमारास घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी वीरपालनं रोहडाई पोलिसांना फोनकरून, "मी पत्नीच्या डोक्यात बॅट घालून तिची हत्या केली आहे", असे सांगितले. थोड्यावेळानंतर वीरपाल स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. ही घटना जिल्ह्यातील रेवाडी नागलिया रनमोख गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय वीरपाल पत्नीवर कायम संशय घ्यायचा. त्याची मानसिक स्थितीही ठिक नव्हती. यातच या दोघांमध्ये बुधवारी भांडण झाले, याच रागात आज पहाटे घरात असलेल्या बॅटनं वीरपालनं पत्नीची हत्या केली. हत्येनंतर वीरपालनं स्वत: पोलिसांना फोन करून याबाबत माहिती देत आपला गुन्हा कबूल केला. वाचा-सुशांतच्या आत्महत्येचं दुबईतील डॉनशी कनेक्शन? भाजप खासदाराची CBI चौकशीची मागणी घराच्या छतावर सापडला महिलेचे मृतदेह पळून जाण्याऐवजी आरोपीने स्वत: पल्हावस पोलीस स्टेशनला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी आरोपीच पोलिसांकडे पोहचला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता वीरपालची पत्नी मनिषा हिचा मृतदेह घराच्या छतावर रक्ताने माकलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवला आहे. तर, पोलिसांनी आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी पतीची कोव्हिड-19 चाचणीही करण्यात आली आहे. प्राथमिक पोलिस चौकशीत वीरपाल आजारी असल्याचे निदर्शनास आले. ज्यासाठी त्याच्यावरही उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिस कारवाई करत आहेत. वाचा-औषध घेण्याआधीच दुकानाच्या पायरीवर झाला मृत्यू, कोरोना रिपोर्टनंतर हादरलं शहर
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या