Home /News /national /

हुल्लडबाज तरुणांनी धावत्या रिक्षावर मारला वॉटर बलून; भयंकर अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

हुल्लडबाज तरुणांनी धावत्या रिक्षावर मारला वॉटर बलून; भयंकर अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Viral Video: भारतीय संस्कृतीत धुलिवंदन किंवा रंगपंचमी हा सण ऐक्याचा आणि रंगाचा सण मानला जातो. यादिवशी देशभरातील लोक आपसातील मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण या सणाला गालबोट लावणाऱ्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत.

पुढे वाचा ...
    लखनऊ, 20 मार्च: भारतीय संस्कृतीत धुलिवंदन किंवा रंगपंचमी हा सण ऐक्याचा आणि रंगाचा सण मानला जातो. यादिवशी देशभरातील लोक आपसातील मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण या सणाला गालबोट लावणाऱ्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. अशीच एक घटना पश्चिम उत्तर प्रदेशातील बाघपत जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी काही तरुणांनी धावत्या रिक्षावर वॉटर बलून मारला होता. वॉटर बलून चुकवण्याच्या नादात रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. धावत्या रिक्षावर वॉटर बलून मारल्याने समतोल बिघडून प्रवाशांसह रिक्षा उलटला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. या दुर्दैवी घटनेत किती प्रवाशी जखमी झालेत? याची माहिती अद्याप समोर आली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. क्षणभराची मजा किती भयंकर ठरू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून समोर आला आहे. हेही वाचा-डीजेच्या तालावर केलेला धांगडधिंगा जीवावर बेतला,रंगपंचमीच्या दिवशीच तरुणाची हत्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका रस्त्याच्याकडेला काही तरुण वॉटर बलून घेऊन उभे आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर ते बलून टाकत आहेत. याचवेळी रस्त्यावरून येणाऱ्या रिक्षावर देखील तरुणांनी पाण्याने भरलेला फुगा फेकला आहे. संबंधित तरुण फुगा फेकत असल्याचं पाहून रिक्षाचालकानं रिक्षाचा वेग वाढवला होता. तरीही तरुणांनी रिक्षावर वॉटर बलून फेकला आहे. यावेळी वेगवान रिक्षाचा समतोल बिघडल्याने रिक्षा रस्त्यावर उलटला आहे. यावेळी रिक्षातून काही प्रवाशी देखील प्रवास करत होते. प्रवाशांसह हा रिक्षा उलटल्याने अनेक प्रवाशी जमखी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील बाघपत याठिकाणी शनिवारी घडली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या