मराठी बातम्या /बातम्या /देश /चिंताजनक! भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

चिंताजनक! भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण

भारताची जागतिक भूक इंडेक्समध्ये घसरण

Hunger Index 2022: जागतिक भूक निर्देशांक म्हणजेच हंगर इंडेक्समध्ये भारताची 6 स्थानांनी घसरण झाली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : अन्नटंचाई, उपासमारीबाबत नुकताच एक अहवाल समोर आलाय. या अहवालामध्ये कृषिप्रधान भारत उपासमारीच्या संकटात असल्याचं वास्तव समोर आलं आहे. ‘जागतिक भूक निर्देशांक’ अर्थात ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ अहवालानुसार, उपासमार तसंच कुपोषणाबाबत भारताची परिस्थिती गंभीर आहे. जगातील 121 देशांच्या यादीत, भारत 107 व्या स्थानावर आहे.

    ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी आणखीनच खराब झाली आहे. या पूर्वीचा अहवाल पाहता नव्या अहवालात भारताची 6 स्थानांनी घसरण झालीय. ताज्या क्रमवारीनुसार, भारत 121 देशांमध्ये 107 व्या क्रमांकावर आहे. या पूर्वी 116 देशांच्या क्रमवारीत भारत 101 व्या क्रमांकावर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या क्रमवारीत भारताच्या शेजारी असणारे पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे देश भारताशी तुलना केल्यास चांगल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. दक्षिण आशियातील देशांमध्ये अफगाणिस्ताननंतर भारताची स्थिती सर्वांत वाईट आहे.

    ग्लोबल हंगर इंडेक्समधील क्रमांक जीएचआय स्कोअरच्याआधारे ठरवण्यात येतो. या पूर्वी यात 2020 मध्ये भारत 94 व्या क्रमांकावर होता. पण भारताचा हा स्कोअर सातत्याने कमी होत आहे. सध्या भारताचा स्कोअर 29.1 आहे. 2000 मध्ये तो 38.8 होता. तर, 2012 ते 2021 यादरम्यान तो 28.8 - 27.5 दरम्यान राहिला. कुपोषण, बाल विकास दर आणि बालमृत्यू या निर्देशांकांवर जीएचआय स्कोअर ठरवला जातो.

    उपासमारीमुळे मरणाऱ्यांची संख्या हजाराच्या घरात

    अहवालानुसार, भारतात अनेक लोक असे आहेत, ज्यांना दररोज पोटभर अन्न मिळत नाही, व ते रात्री उपाशीपोटी झोपतात. 2020 मध्ये, दक्षिण आशियामध्ये 1331.5 दशलक्ष लोकांना निरोगी आहार मिळत नव्हता, आणि त्यापैकी 973.3 दशलक्ष लोक भारतातील होते. उपासमारीने मरणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहिली तर भारतात दरवर्षी 7 हजार ते 19 हजार लोक उपासमारीने मरतात. म्हणजेच 5 ते 13 मिनिटांत उपासमारीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होता. तसेच इंडिया फूड बँकिंग अहवालानुसार, भारतातील 189.2 दशलक्ष लोक कुपोषित आहेत. यावरुन आपल्या देशातील सुमारे 14 टक्के लोकसंख्या कुपोषित असल्याचा अंदाज लावता येईल.

    वाचा - Amul Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका; अमूल दूध महागलं

    या देशांची अवस्था भारतापेक्षा वाईट

    ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतापेक्षा वाईट अवस्था असणाऱ्या देशांमध्ये अफगाणिस्तान, झांबिया आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन, लेसोथो, लायबेरिया, नायजर, हैती, चाड, डेम, मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, येमेन आदींचा समावेश आहे. अहवालात म्हटलं आहे की, गिनी, मोझांबिक, युगांडा, झिम्बाब्वे, बुरुंडी, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सीरियासह 15 देशांसाठी क्रमवारी निश्चित केली जाऊ शकत नाही.

    पाकिस्तान, श्रीलंका कितव्या स्थानावर?

    भारताच्या शेजारी देशांची ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतापेक्षा चांगली क्रमवारी आहे. यात पाकिस्तान 99 व्या, श्रीलंका 64 व्या, बांगलादेश 84 व्या, नेपाळ 81 व्या आणि म्यानमार 71 व्या क्रमांकावर आहे.

    दरम्यान, ग्लोबल हंगर इंडेक्सवरुन आपल्या देशातील बहुतांश लोकांना अजूनही खायला पोटभर अन्न मिळत नाही, हे स्पष्ट होतय. या गंभीर परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सरकारला काही उपाययोजना नक्कीच करता येतील. पण यासाठी राजकीय इच्छाशक्तीसह काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

    First published:

    Tags: Pakistan, Who