कसा झाला Air Strike? मिराजच्या पायलटनं सांगितली कहाणी

How To Prepare For Air Strike : भारतीय हवाई दलानं कशा प्रकारे Air Strike केला याची माहिती हवाई दलाच्या दोन वैमानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 10:51 AM IST

कसा झाला Air Strike? मिराजच्या पायलटनं सांगितली कहाणी

नवी दिल्ली, 25 जून : पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे Air Strike करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी भारताचा धसका घेतला. भारतीय हवाई दलानं केलेला Air Strike हा अत्यंत धाडसी होता. कारण, पाकिस्तानच्या हद्दीत जात भारतीय हवाई दलानं ही कारवाई केली होती. या Air Strikeबद्दल अत्यंत गुप्तता राखण्यात आली होती. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि वैमानिक यांनाच केवळ माहिती होती. न्यूज18 नेटवर्कनं या Air Strikeमध्ये सहभागी असलेल्या दोन वैमानिकांशी संवाद साधला. त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर अत्यंत धाडसी अशा Air Strikeची माहिती न्यूज18 नेटवर्कला दिली आहे.

अभ्यासावर भर

Air Strike करताना भारतीय हवाई दलानं अभ्यासावर भर दिला. वैमानिकांना काही दिवस अगोदर ट्रेनिंग देण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 या विमानांचे तीन स्क्वाड्रन या सरावामध्ये सहभागी झाल्या होत्या.

भारताला मोठा दिलासा दिला, UAE दिले 'हे' आश्वासन!

वैमानिकांना नव्हती माहिती

Loading...

Air Strikeबद्दल वैमानिकांना कोणतीही माहिती नव्हती. कोणालाही या मिशनबद्दल कल्पना देण्यात आलेली नव्हती. मिराज 2000चा सराव सुरू होता. सरावादरम्यान मिराज विमानांवर कोणतीही शस्त्र लावण्यात आली नव्हती. ज्या रात्री Air Strike होणार होता त्यावेळी मिराजवर बॉम्ब आणि शस्त्र लावण्यात आली.

कुटुंबियांना नव्हती कल्पना

वैमानिकांच्या कुटुंबियांना देखील याबद्दल काहीही कल्पना नव्हती. वैमानिकांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये उत्साह होता. पण, कुटुंबियांसमोर त्याचं वागणं हे नेहमीप्रमाणे होतं. यासाठी 12 वैमानिकांनी निवड करण्यात आली होती.

Instagramच्या 'Oyesomya' या अकाउंट पासून सावध राहा

बॉम्ब हल्ला करून परतायचं होतं

दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला करून लगेच परतण्याचे आदेश भारतीय हवाई दलाला देण्यात आले होते. सहा विमानं बॉम्बहल्ला करणार होते तर सहा विमानांनी त्यांना संरक्षण दिलं होतं. त्यानंतर 60 सेकंद ते 90 सेकंदामध्ये वैमानिकांना परत येण्याचे आदेश देण्यात आले होते. वैमानिकांनी देखील आदेशाचं पालन केलं.

दोन दिवस केला आराम

वैमानिकांनी हल्ला करण्यापूर्वी दोन दिवस आराम केला. शिवाय, Air Strikeपूर्वी वैमानिकांनी कुटुंबियांशी फोन आणि व्हॉट्सअपवर संपर्क साधला. Air Strike पूर्वी आणि Air Strikeनंतर वैमानिकांनी कोणत्याही प्रकारची सुट्टी घेतली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 10:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...