मोठी बातमी : RTO ची टेस्ट न देताही काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणूण घ्या प्रक्रिया

मोठी बातमी : RTO ची टेस्ट न देताही काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणूण घ्या प्रक्रिया

आरटीओमध्ये होणारी टेस्ट टाळून तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकतो. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयानं (Ministry of Road Transport) मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल,

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) काढणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आरटीओमध्ये होणारी टेस्ट टाळून तुम्हाला वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकतो. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयानं (Ministry of Road Transport) मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्यानंतर या सेंटरकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना आपल्याला टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. देशभरात ही अधिकृत प्रशिक्षण सेंटर 1 जुलै 2021 पासून सुरू होत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयानं याबाबत नवा आदेश जारी केला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य प्रशिक्षित चालकांचा अभाव. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या देशात 22 लाख वाहन चालकांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते व परिवहन मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वांनुसार देशभरात चालक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मंत्रालयाच्या नियमांनुसार लोक अशी केंद्रं उघडू शकतात, ज्यामध्ये लोकांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण दिल्यानंतर चालकाची चाचणी घेतली जाईल आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र  दिले जाईल, त्या आधारे चाचणी न देता आरटीओ कार्यालयातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल.

हे वाचा - ‘मी जाड असो किंवा सडपातळ; पण स्वतःसाठी खास आहे’, विद्या बालननं सांगितलं यशाचं रहस्य

चालक प्रशिक्षण केंद्रासाठी अटी

प्रशिक्षण केंद्रासाठी मैदानी भागात दोन एकर आणि डोंगराळ भागात एक एकर जागेची आवश्यकता असेल. एलएमव्ही आणि एचएमव्ही दोन्ही वाहनांसाठी सिम्युलेटर अनिवार्य असेल, ज्याद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल. येथे बायोमेट्रिक हजेरी आणि इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. पार्किंग, रिव्हर्स ड्रायव्हिंग, डाउनहिल ड्रायव्हिंग इत्यादी प्रशिक्षण देण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रॅक अनिवार्य असेल. यामध्ये थिअरी आणि सेगमेंटेशनचेही कोर्स असतील. केंद्रातील सिम्युलेटरच्या मदतीनं महामार्ग, ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी आणि रस्त्यावर लेनमध्ये पावसात, धुकं असताना तसंच रात्रीच्या वेळी वाहनं चालविण्याचे प्रशिक्षण दिलं जाईल.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 9:44 PM IST

ताज्या बातम्या