नवी दिल्ली, 13 जून : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ट्रकमधून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. आता अमेरिका दौऱ्यावरून परतलेले राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रकमध्ये स्वार झाल्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी ते न्यूयॉर्कपर्यंत ट्रकने प्रवास केला. यादरम्यान काँग्रेसने राहुल गांधी आणि भारतीय वंशाचा ट्रक चालक तलजिंदर सिंग यांच्यातील गप्पांचा व्हिडिओ आपल्या ट्विटर आणि यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या संभाषणात, तलजिंदर अमेरिकेत काम केल्यानंतरचे अनुभव आणि भारतात ट्रक चालवण्यापेक्षा ते कसे वेगळे आहे, याबद्दल सविस्तर बोलला आहे. या ट्रकमधील सुविधांमुळे राहुल गांधी खूप प्रभावित झाले होते, पण जेव्हा त्यांनी तलजिंदरच्या कमाईबद्दल ऐकले तेव्हा तर त्यांना धक्काच बसला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका ठिकाणी म्हणतात, ‘हा ट्रक पाहून असे वाटते की ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन तो बनवला गेला आहे, पण भारतात असे दिसत नाही.’ यावर तलजिंदर सांगतात की अमेरिकेत ट्रक ड्रायव्हर्सची काळजी घेतली जाते, कारण इथे ते मॅन्युफॅक्चरिंगचा एक भाग मानले जातात.
"कितना कमा लेते हो?"
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 13, 2023
"कुछ गाने बजा लें? सिद्धू मूसेवाला के?"
"हम ट्रक वालों के कारण ही मैन्युफैक्चरर्स का काम चलता है।”
अमेरिका में एक भारतीय ड्राइवर के साथ ट्रक यात्रा, उनके अनुभव और कहानियां!
पूरा वीडियो यूट्यूब पर:https://t.co/AxWYEHoka7 pic.twitter.com/KQ8OJq8Vrg
यादरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हरला गाणे वाजवण्यास सांगितले. कोणतं गाणं? असं तलजिंदरने विचारलं. यावर राहुल म्हणतात, “सिद्धू मूसवालाचे 295 लावा…” कमाई ऐकून राहुलही हैराण यानंतर राहुल गांधींनी तलजिंदरला विचारले की, तुम्ही किती कमावता, तेव्हा ते म्हणतात, ‘भारताच्या तुलनेत ते इथे खूप कमावतात. जर तुम्ही फक्त ड्रायव्हर म्हणून काम केले तर तुम्ही 5 हजार डॉलर्स (4-5 लाख रुपये) मिळवाल आणि जर तुमच्याकडे स्वतःचा ट्रक असेल तर 8 लाख रुपये (8-10 हजार डॉलर) कुठेही गेले नाहीत. तलजिंदरच्या या उत्तरावर राहुल गांधी आश्चर्याने विचारतात की, ‘महिन्याचे…’, तर तलजिंदर यावर म्हणतात, होय, तो दरमहा 8 लाख रुपये कमावतो. या उद्योगात भरपूर पैसा आहे. वाचा - PHOTOS: प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात राहुलला पाहून आधी बसला धक्का; मग घेऊ लागले सेल्फी; काय आहे प्रकरण? भारत आणि अमेरिका यांच्यात फरक यादरम्यान तलजिंदर भारत आणि अमेरिकेत ट्रक चालवण्यातील फरक सांगतो. ते म्हणाले की अमेरिकेत कोणताही पोलीस त्रास देत नाही. प्रवासात कोणतीही वसुली होत नाही. यासोबत ‘अमेरिकेत ट्रक ड्रायव्हरला क्रेडिटवर सहज कर्ज मिळू शकते, पण भारतात जेव्हा ट्रक ड्रायव्हर किंवा गरीब व्यक्ती कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो तेव्हा त्याच्याकडे जमीन किंवा मालमत्तेची मागणी केली जाते. गरीब माणसाकडे मालमत्ता, कागदपत्रे कुठून येणार? लोकांना कर्ज मिळत नाही. परिणामी त्यांना इतरांचे ट्रक चालवावे लागतात.