संभलनगर, 5 जुलै : उत्तरप्रदेशच्या संभलनगरमधून (Sambhalnagar UP) एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी देवी-देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्रात चिकन विकण्यापासून (Chicken Selling on Newspaper) रोखायला गेलेल्या पोलीस पथकावरच चाकूने हल्ला करण्यात आला. (Chicken Selling on God Photos in newspaper) याप्रकरणी पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संभलनगरमध्ये एका हॉटेल चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव तालिब हुसैन असे आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
पुलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी तालिब हुसैन याने आपल्या हॉटेलमध्ये देवी देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्रांवर चिकन ठेवून तो ते विकत होता. काही लोकांनी याप्रकरणी तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारावर पोलीस पथकाने आरोपीच्या हॉटेलात पोहोचले. यावेळी चौकशीच्या दरम्यानच आरोपी तालिब हुसैन याने थेट पोलिसांवरच चाकूने हल्ला केला.
याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा आरोपी तालिब विरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 अ (शत्रुत्व पसरवणे), 295 अ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने पूजास्थळाचे नुकसान करणे किंवा अपवित्र करणे), 353 (अधिकृत कामात अडथळा निर्माण करणे) आणि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मिश्रा यांनी पुढे सांगितले की, घटनास्थळावरून देवदेवतांची छायाचित्रे असलेल्या वर्तमानपत्रांच्या प्रती आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
यूपी के संभल में देवी देवताओं के फोटो वाले अख़बारों में नॉनवेज पैक कर बेचने वाले तालिब नाम के एक शख़्स को पुलिस ने किया गिरफ़्तार । यहां महक रेस्टोरेंट नामक होटल काउंटर से भारी तादात में देवी देवताओं के फोटो वाले अखबार भी मिले हैं। @Uppolice @sudhirbishnoi_ pic.twitter.com/6y1DlsoYiW
— Vishal Kaushik🇸🇴 (@ivishalkaushik) July 4, 2022
याप्रकरणी विशाल कौशिक नावाच्या व्यक्तीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. तालिब हुसेनच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात हिंदू देवता असलेले वर्तमानपत्रही जप्त करण्यात आले आहेत. विशाल कौशिक यांनी ट्विट करून लिहिले की, 'यूपीच्या संभलमध्ये देवतांच्या फोटोसह वर्तमानपत्रांमध्ये नॉनव्हेज विकणाऱ्या तालिब नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मेहक रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलच्या काउंटरवरून देवतांचे फोटो असलेली वर्तमानपत्रेही मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chicken, Up crime news