मराठी बातम्या /बातम्या /देश /वरण-भात, रसगुल्ला...... याठिकाणी गरजूंना मिळते फक्त 5 रुपयात जेवण VIDEO

वरण-भात, रसगुल्ला...... याठिकाणी गरजूंना मिळते फक्त 5 रुपयात जेवण VIDEO

5 रुपयात जेवण

5 रुपयात जेवण

याठिकाणी फक्त पाच रुपयात भरपेट जेवण मिळते.

  • Local18
  • Last Updated :
  • Begusarai, India

नीरज कुमार, प्रतिनिधी

बेगूसराय, 19 मार्च : बिहारमधील बेगुसराय हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इतर जिल्ह्यातूनही येथे मजूर चरितार्थासाठी येतात. या मजुरांसोबतच सदर रुग्णालयात उपचारासाठी येणारे गरीब रुग्णांचे नातेवाईक, भिकारी, रिक्षावाले यांना पैशाअभावी त्यांची भूक भागवता येत नाही. त्यामुळे बेगुसराय शहरी भागात कोणीही उपाशी राहू नये यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. काही तरुण मित्र मिळून साईं की रसोई (साईंचे स्वयंपाकघर) उभारून गरजू लोकांना अन्न पुरवत आहेत.

बेगुसराय येथील पाच मित्रांनी मिळून 29 ऑगस्ट 2019 रोजी साई की रसोई सुरू केली. तेव्हापासून ते दररोज गरजूंना अन्न पुरवत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते त्यांच्या जमा झालेल्या भांडवलाच्या आधारे आणि लोकांकडून मिळालेल्या देणगीतून खर्च करतात.

दिल्लीच्या दादी की रसोई मधून सूचली कल्पना -

बेगुसराय येथील रुग्णालयासमोर हे स्वयंपाकघर जिल्ह्यातील पाच उत्साही तरुण चालवत आहेत. त्याचे संस्थापक अमित जैस्वाल यांनी न्यूज18 लोकलला सांगितले की, किशन गुप्ता, अमित जैस्वाल, नितेश रंजन, निखिल आणि पंकज यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8 वाजता याची सुरुवात केली होती.

दररोज 150 लोकांना जेवण -

तेव्हापासून आजतागायत सतत रात्री 8 वाजता गरजूंना अन्नदान केले जात आहे. सध्या साईच्या रसोईमध्ये 30 तरुण जोडले गेले आहेत. त्यांचा उद्देश गरजू लोकांना खाऊ घालणे हा आहे, जेणेकरून ते उपाशी झोपू नयेत. दररोज 150 हून अधिक गरजूंना जेवण दिले जाते. ज्यामध्ये स्थानिक भिकाऱ्यांचाही समावेश आहे. बेगुसरायच्या उत्साही तरुणांना दिल्लीतील दादी की रसोई या माध्यमातून ही कल्पना सुचली.

" isDesktop="true" id="851896" >

5 रुपयात पोटभर जेवण मिळते, पैसे नाही तरी मिळणार जेवण -

साईंच्या किचनच्या कॅश काउंटरकडे पाहत असलेल्या निखिल राजने सांगितले की, जेवण देण्यासाठी टोकन मनी म्हणून फक्त 5 रुपये घेतले जातात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना जेवणही दिले जाते. कोणालाही निराश होऊन परतण्याची परवानगी नाही. हा फूड स्टॉल रोज रात्री 8 ते 9 या वेळेत चालतो. डाळ-भात, रसगुल्ला याशिवाय इतरही अनेक दर्जेदार स्वादिष्ट पदार्थ इथे मिळतात. जेवण घेत असलेले रामविलास राम यांनी सांगितले की, ते अनेक महिन्यांपासून येथे जेवत आहेत, जेवण अतिशय चवदार असल्याचे ते म्हणाले.

साई की रसोईच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या नितेश रंजन यांनी सांगितले की, त्यांच्या टीमसोबत वर्षभर चर्चा केल्यानंतर त्याची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासून पुढील 3 महिन्यांसाठी निधीची व्यवस्थाही देणगीच्या माध्यमातून करण्यात आली. ही रसोई चालवण्यासाठी दरमहा 75 ते 80 हजार रुपये लागतात, असे त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Bihar, Local18, Local18 food