नवी दिल्ली, 4 जुलै : एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माची (Religion) आहे म्हणून त्याच्यावर हल्ला चढवणे, मॉब लिंचिंग (Mob Lynching) करणे हे प्रकार हिंदू धर्मविरोधी (Against Hindu Religion) आहेत, असं विधान करत सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी सहिष्णूतेची आठवण करून दिली आहे. जे लोक धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग करतात, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, असं रोखठोक मत भागवत यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. स्वतःला हिंदू नाही तर भारतीय (Indian) म्हणा, असा नारादेखील भागवतांनी या व्यासपीठावरून दिला.
We are in democracy. There can't be dominance of Hindus or Muslims. There can only be dominance of Indians: RSS chief Mohan Bhagwat
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2021
काय म्हणाले सरसंघचालक
काही लोक मला भोळसट समजतील, पण मी सत्यच सांगणार असल्याचं भागवत म्हणाले. हिंदू आणि मुस्लिम हे 40 हजार वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्यामुळे दोघांचाही जिन्स एकच असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे. माझ्या या विधानाचं अनेकांचं आश्चर्य वाटेल, पण विचारी हिंदू माझं हे मत मान्य करतील, असंही भागवतांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून ते इथं राहणाऱ्या सर्व धर्मांचं असल्याचं विधान भागवतांनी केलं आहे. त्यामुळे मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही, असं म्हणत त्यांनी हिंदु-मुस्लिम एकतेचा वेगळा अर्थ सांगितला. हिंदू मुस्लिम एकता ही भ्रामक कल्पना आहे, कारण मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असं ते म्हणाले.
DNA of all Indians same, irrespective of religion: RSS chief Mohan Bhagwat at event organised by Muslim Rashtriya Manch
— Press Trust of India (@PTI_News) July 4, 2021
हिंदू नको भारतीय म्हणा
आपला धर्म कुठलाही असला तरी आपण भारतीय आहोत. त्यामुळं हिंदूंनी स्वतःची ओळख भारतीय म्हणून करून द्यावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. हिंदू आणि मुस्लिम आपण दोघंही एकत्र चालत आलो आहोत, चालत आहोत आणि भविष्यातही एकत्रच चालत राहू, असा नारा भागवतांनी दिला.
हे वाचा -धक्कादायक! कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
भावना समजून घ्या
स्वतःला कुठल्याही धर्मापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन भागवत यांनी केलं आहे. एकमेकांवर हल्ले करणं, एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या कारणाने समुहानिशी चालून जाणं, हे प्रकार भारतीय संस्कृतीशी विसंगत असून ते ताबडतोब थांबायला हवेत आणि अशा प्रकारांचा निषेध करायला हवा, असंही भागवतांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hindu, Muslim, Rss mohan bhagwat