हिमाचल प्रदेश, 01 ऑक्टोबर: इमारत कोसळतानाचा (Building collapsed) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी शिमला (Shimla) येथील आहे. सध्या शिमलामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची (landslide) घटना घडली आहे. या गुरुवारी संध्याकाळी एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे. या इमारतीचा व्हिडिओ समोर आला आहे. (video of incident is going viral on social media) शिमल्यातील कच्ची खोऱ्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे इतर इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
A multi-storey building collapsed in Kachighati area of #Shimla today evening.
— Diksha Verma (@dikshaaverma) September 30, 2021
Looks like it’s straight out of a movie scene 😳 pic.twitter.com/jMAYFAxuLv
सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी (No casualties) झालेली नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितलं की, ही घटना शिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेनंतर नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाजही घटनास्थळी पोहोचले. त्याने नुकसानीचा आढावा घेतला आहे आणि सर्व शक्य मदत करणार असल्याचं सांगितलं. असं सांगितलं जात आहे की, लोक इमारत कोसळण्यापूर्वी बाहेर पडले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक उंच इमारत केवळ 6-7 सेकंदात कशी कोसळतेय हे दिसून येतंय. असं म्हटलं जात आहे की, कोसळलेली इमारत सात मजली होती आणि भूस्खलनामुळे इमारतीला तडे गेले होते.
— Sudhanshu Maheshwari (@smaheshwari523) September 30, 2021
जमीनदोस्त झालेल्या इमारतीला सकाळीच तडे गेले होते, त्यानंतर ती इमारत रिकामी करण्यात आली. आता जी इमारत पडली आहे त्याच्या आसपासच्या इतर इमारतींचा पायाही कमकुवत दिसत आहे. हेही वाचा- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनचा घराच्या गच्चीवर संशयास्पद मृत्यू दुसरीकडे अजूनही या भागात भूस्खलनाचा धोका आहे. ज्यामुळे इतर अनेक इमारती देखील जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. कच्ची खोऱ्यात असलेल्या परिसरातील अनेक घरे डोंगरावरच बांधली गेली आहेत. यामुळे त्यांचा पाया आधीच खूप कमकुवत आहे. अशा परिस्थितीत, जर भूस्खलन झालं तर इतर इमारतीही कोसळू शकतात.