शिमला, 23 डिसेंबर: हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) शिमलामध्ये (Shimla) एका मुलानं स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर तरुण घरी आला आणि मोठ्यानं आवाजात गायला लागला. नंतर बंदुकीनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. हिमाचल प्रदेशातील शिमला (Shimla) जिल्ह्यातील ठियोगमध्ये ही घटना घडली आहे. शिमलाचे डीएसपी कमल वर्मा यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. शिमल्याच्या ठियोग पोलीस स्टेशन अंतर्गत देवी मोर जवळील सनाना गावात 19 वर्षीय बीटेक विद्यार्थ्यानं आत्महत्या (committed suicide) केली आहे. तरुणाने पिकाच्या रक्षणासाठी घरात ठेवलेल्या 12 बोअरच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडली. मात्र, त्याने आत्महत्येचं पाऊल का उचललं याचा खुलासा झालेला नाही. हेही वाचा- रात्री एकत्र झोपले होते काका-पुतण्या, सकाळी खोलीत आढळले मृताव्यस्थेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनाना गावातील रोहित यानं त्याच्या खोलीत स्वत:वर गोळी झाडली. 19 वर्षीय रोहित प्रगती नगर येथील अटल विहारी वाजपेयी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकचा विद्यार्थी होता. पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन मंगळवारी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरात ठेवलेल्या 12 बोअरच्या बंदुकीचा परवाना वडील रमेश चंद यांच्या नावावर आहे. वडील बागायतदार असून त्यांना तीन मुलगे आहेत. रोहित सर्वात मोठा मुलगा होता. स्वतःला खोलीत बंद करून मोठ्या आवाजात लावली गाणी रोहित हा प्रगतीनगर येथून छैला येथे लस घेण्यासाठी आला होता. त्यानंतर लस घेतल्यानंतर तो घरी आला. त्याने फोन करून धाकट्या भावाला पप्पा-मम्मी कुठे आहेत विचारले. त्याचे नातेवाईकही लस घेण्यासाठी गेले होते. नंतर तो स्वतःच्या खोलीत गेला आणि त्यानं मोठ्या आवाजात गाणी लावली. संध्याकाळी घरातील सदस्य घरी आले असता खोलीत बंदूक पडलेली दिसली आणि रोहितही बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं असता. त्याला मृत घोषित करण्यात आलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.