Home /News /national /

विद्यार्थ्याला आला राग, थेट शिक्षकाच्याच लगावली कानशिलात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

विद्यार्थ्याला आला राग, थेट शिक्षकाच्याच लगावली कानशिलात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

या घटनेची माहिती शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली. मात्र, हे प्रकरण शांत करण्यात आलं असून पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही.

    हिमाचल प्रदेश, 18 डिसेंबर: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) हमीरपूर (Hamirpur) जिल्ह्यातील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकाच्या कानाशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. वर्गात मोबाईल आणल्यानं शिक्षक विद्यार्थ्याला ओरडले. ओरडल्याचा राग आल्यानं दुखावलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यानं शिक्षकावरच (12th class student) हात उगारला आहे. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीवर आले. या घटनेची माहिती शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली. मात्र, हे प्रकरण शांत करण्यात आलं असून पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही. हेही वाचा- देशात Omicron चा खतरा..! 15 दिवसात 'या' 11 राज्यात व्हेरिएंटचं थैमान मिळालेल्या माहितीनुसार, कानाखाली मारल्याच्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केले. शाळेचं नावलौकिक वाचवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्याची कसरत सुरूच होती. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केलं होतं. सदर विद्यार्थ्याचा स्वभावही उद्धट असल्याचं सांगण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण बारावीचा विद्यार्थी मोबाईल घेऊन शाळेत पोहोचला होता. मोबाईल शाळेत आणल्याबद्दल व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकाने आक्षेप घेत विद्यार्थ्याला खडसावले. यानंतर विद्यार्थ्याने घरून कुटुंबीयांसह शाळा गाठली आणि नंतर विद्यार्थ्याने व्यावसायिक शिक्षकावर हात उगारला. हेही वाचा- मोठी बातमी: टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी 'या' खेळाडूची निवड, रोहितची घेणार जागा  शाळेतील शिक्षकावर विद्यार्थ्याने हात उगारल्याची माहिती अधिकृतपणे मिळालेली नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक दिलवरजित चंद्रा यांनी सांगितले. मात्र शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली जाईल, असंही ते म्हणालेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Himachal pradesh

    पुढील बातम्या