मंडी, 17 जुलै : गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशात महापुराने थैमान घातलं. अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याने धोका पातळी ओलांडली होती. महारापूर ओसरत असताना आता हिमाचल प्रदेशातील कुल्लू ते मंडी पर्यंत व्यास नदीत आतापर्यंत 33 मृतदेह आढळून आले आहेत. फक्त कुल्लू जिल्ह्यात 26 मृतदेह सापडले आहेत. मंडी पोलिसांनी 7 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अजुनही मृतदेह सापडत असून काहींची ओळख पटलेली नाही. डीजीपी संजय कुंडू सध्या कुल्लू आणि मंडी दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, कुल्लू पोलिसांनी व्यास नदीच्या पूर बाधित भागातून 18 मृतदेह आणि श्री खंड महादेव इथून 8 मृतदेह ताब्यात घेतले. याशिवाय मंडी जिल्हा पोलिसांनी 7 मृतदेह ताब्यात घेतले असून यापैकी चौघांची ओळख पटलेली नाही. केदारनाथ मंदिरात मोबाईलवर बंदी, PHOTO, रिल्स काढल्यास होणार मोठी कारवाई महापुरावेळी कुल्लू आणि इतर भागातून 29 देशांच्या 667 परदेशी पर्यटकांना सुखरुप बाहेर काढलं. विविध राज्यातील 22 बेपत्ता पर्यटकांना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू आहे. बचावकार्यावेळी इस्राईलमधील 440, रशियातील 160, अमेरिकेतील 40 नागरिकांना बाहेर काढण्यात आले. कुल्लू पोलिसांनी 11 हजार वाहने आणि 70 हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. मदतीसाठी कंटोरल रूम तयार केली असून 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मंडी पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनावेळी वेगवेगळ्या भागातून 7 मृतदेह आढळून आले. यातील तीन मृतदेहांची ओळख पटली असून 4 इतर मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तर पोलिसा ठाण्याच्या परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांचा वाहून गेल्याने नुकसान झाले असून याची आकडेवारी 94 लाख रुपयांपर्यंत आहे. व्यास नदीच्या किनारी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचेही नुकसान झाले असून यासाठी 5 लाखांचा खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्यास नदीमध्ये आता मृतदेह आढळत असून पोलिसांसमोर या मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.