केदारनाथ : काही दिवसांपूर्वी एका तरुणीनं तरुणाला केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर केदारनाथ इथे मोबाईल बंद करावा अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. भाविकांनी संताप व्यक्त केला. मंदिराचं पावित्र्य अशानं घालवलं जात असल्याची टीकाही केली. अशा काही घडामोडींनंतर मंदिर प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. केदारनाथ मंदिरासमोर बरेच जण रिल्स, सेल्फी किंवा कपल फोटो घेण्याच्या नादात दर्शन घ्यायचं बाजूलाच राहातं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन मंदिर प्रशासनानं मोबाईलवर बंदी घातली आहे. रिल्स, फोटोग्राफी किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी देखील बंदी असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
#WATCH उत्तराखंड: श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिति ने केदारनाथ मंदिर के अंदर फोटोग्राफी और वीडियोग्राफी पर प्रतिबंध लगा दिया है। मंदिर समिति केदारनाथ मंदिर परिसर में जगह-जगह चेतावनी बोर्ड लगाई कि अगर कोई फोटो लेता या वीडियो बनाता पकड़ा गया तो उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की… pic.twitter.com/7yuMj9ysmC
— ANI_HindiNews (@AHindinews) July 17, 2023
एका महिलेनं नुकताच केदारनाथ आणि बद्रीनाथ इथला व्हिडीओ ब्लॉग केला होता. हा व्हिडीओ विवादास्पद असल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर मंदिर समितीने मोबाईलवर बंदी घातली आहे. मंदिर समितीने ठिक ठिकाणी मोबाईल घेऊन आत प्रवेश करुन नये असे बोर्ड लावले आहेत. याशिवाय प्रत्येक भाविकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून लक्ष ठेवलं जाणार असल्याचंही सांगितलं आहे. मंदिर समितीने केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांना सभ्य कपडे घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय मंदिर परिसरात टेंट लावण्यासाठीही बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मंदिर परिसरात हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोर्डवर भाविकांसाठी सूचना लिहिण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई केली आहे. ज्यांच्याकडे फोन होते त्यांना ते पूर्ण बंद स्वीच ऑफ करण्याच्या सूचना दिल्या होत्या.