वॉशिंग्टन, 29 ऑगस्ट : फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांच्या पार्टीचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच काही जण मरिन यांना पाठिंबा देत आहेत. या सुरू असलेल्या गदारोळात अमेरिकेच्या माजी अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांनी स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करून मरिन यांचं समर्थन केलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये 2012 मध्ये हिलरी सेक्रेटरी ऑफ स्टेट असताना कोलंबिया दौऱ्यात एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहेत. ‘कीप डान्सिंग’ असं कॅप्शन हिलरी क्लिंटन यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला दिलंय. या संदर्भात हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिलंय.
क्लिंटन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय अमेरिकी राजकारणी अॅन रिचर्ड्स म्हणाल्या होत्या, ’ डान्सर फ्रेड अॅस्टायर याने केलेल्या नाचतानाच्या सगळ्या स्टेप्स अभिनेत्री जिंजर रॉर्सने हाय हील्स घालून केल्या होत्या पण उलट्या पद्धतीने. मी सेक्रेटरी ऑफ स्टेट असताना कार्टाजेनाला गेले होते तेव्हाचा हा माझा (नाचतानाचा) फोटो. कीप डान्सिंग, @सना मरिन.’ हिलरी क्लिंटन यांनी पोस्टमध्ये त्यांच्या 2012 च्या कोलंबिया भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत गर्दी असलेल्या क्लबमध्ये त्या हसत डान्स करताना दिसत आहेत. त्यावेळी हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट होत्या. फोटो शेअर करत ‘कीप डान्सिंग, सना मरिन’, असं त्या म्हणाल्या. तर, फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी ‘धन्यवाद हिलरी क्लिंटन’ म्हणत हार्ट इमोजीसह क्लिंटन यांच्या पोस्टला उत्तर दिलंय. 36 वर्षीय सना मरिन या जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत.
As Ann Richards said, "Ginger Rogers did everything that Fred Astaire did. She just did it backwards and in high heels."
— Hillary Clinton (@HillaryClinton) August 28, 2022
Here's me in Cartagena while I was there for a meeting as Secretary of State.
Keep dancing, @marinsanna. pic.twitter.com/btAtUFOcNV
अलीकडेच फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये मरिन त्यांचे मित्र आणि सेलिब्रिटींच्या एका ग्रुपसोबत नाचताना आणि पार्टी (Party) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मरिन यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीचं हे वर्तन योग्य नाही, असं टीका करणाऱ्यांनी म्हटलंय. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू असलेल्या गदारोळावर जगभरातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिलरी क्लिंटनसह अनेकांनी मरिन यांना पाठिंबा देत आपल्या मित्रांसह खासगी जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार मोठ्या पदावरील व्यक्तीला असतो, असं म्हणत त्यांचं समर्थन केलंय. हेही वाचा - ट्विन टॉवर पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्ये एक तरुण गाढ झोपेत; शेवटी धावाधाव… 74 वर्षांच्या हिलरी क्लिंटन यांनी 2009 ते 2013 पर्यंत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र खात्याचे प्रमुखपद भूषवले होते. 2016 मध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून अमेरिकेची राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली होती. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, मरिन यांनी त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सहकारी सदस्यांना सांगितलं की, काही वेळा अशा गोष्टी करणं आवश्यक आहे. “मी माणूस आहे आणि मीदेखील कधीकधी या काळ्या ढगांमध्ये (कामाच्या रगाड्यात) आनंद, प्रकाश आणि मजा शोधत असते. तसंच मी माझ्या कार्यकाळात कामाचा एकही दिवस वाया घालवला नाही,” असंही मरिन म्हणाल्या. मरिन यांना पार्टीमुळे टीकेला सामोरं जावं लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी जुलैमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका पार्टीदरम्यान दोन महिला टॉप उचलतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळीही मरिन यांना माफी मागावी लागली होती.