नोएडा, 28 ऑगस्ट : नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी एमराल्ड कोर्ट हाउसिंग सोसाइटीच्या एका विशेष टीमने एक महिन्यापूर्वी एक योजना तयार केली होती. याअंतर्गत सोसायटीतील सर्व लोकांना तेथून बाहेर काढण्यात आलं होतं. सोसायटीतील सर्वच जणं शुक्रवारपासून इमारत सोडून बाहेर पडत होते. याशिवाय कुटुंबीयांनी दुसरीकडे राहण्याची व्यवस्थाही केली होती. नोएडातील सुपरटेकच्या या ट्विन टॉवरला रविवारी पाडण्यात आलं. सकाळी 7 वाजेदरम्यान एका सुरक्षारक्षकाने विशेष टीमला टॉवरच्या वरच्या मजल्यावर एक व्यक्ती राहिल्याची सूचना मिळाली होती. दुसऱ्यांदा जेव्हा इमारत रिकामी करण्यासाठी तपासणी करण्यात आली, त्यावेळी याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, एक व्यक्ती सोडून सर्वजण टॉवरच्या खाली उतरले होते. ही व्यक्ती इमारतीत गाढ झोपेत असल्याचं सांगितलं जात होते. याशिवाय टॉवर रिकामी करण्याची तारीखही त्या व्यक्तीच्या डोक्यातून निघून गेली होती. त्याचमुळे हा सर्व प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कसं बसं सुरक्षा रक्षकांनी त्याला जागं केलं आणि साधारण 7 च्या जवळपास त्याला बाहेर काढण्यात आलं.
#WATCH | Once taller than Qutub Minar, Noida Supertech twin towers, reduced to rubble pic.twitter.com/vlTgt4D4a3
— ANI (@ANI) August 28, 2022
नोएडामधील उंच ट्विन टॉवर पाडण्यात येणार असल्याचं समोर आल्यापासून सगळ्यांचंच या घटनेकडे लक्ष लागलेलं होतं. अखेर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी हा टॉवर पाडण्यात आला आहे. 3600 किलो पेक्षा जास्त स्फोटकं वापरून ही इमारत काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही इमारत पाडतानाचा पहिला व्हिडिओ आता समोर आला आहे. हा टॉवर पाडल्यानंतर आसपासचा संपूर्ण परिसर भूकंपासारखा हादरला. या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आसपासच्या परिसरामध्ये धुळींचं साम्राज्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.