मराठी बातम्या /बातम्या /देश /ट्रेन सुटताच ट्रॅकवर कोसळली वीजेची तार, पसरला करंट आणि मग...

ट्रेन सुटताच ट्रॅकवर कोसळली वीजेची तार, पसरला करंट आणि मग...

स्थानकात उभी असणारी (High tension electric wire fell on railway track) रेल्वे तिथून निघाल्यानंतर काही क्षणांत रेल्वेची तार तुटून ट्रॅकवर कोसळल्याची घटना समोर आली आहे.

स्थानकात उभी असणारी (High tension electric wire fell on railway track) रेल्वे तिथून निघाल्यानंतर काही क्षणांत रेल्वेची तार तुटून ट्रॅकवर कोसळल्याची घटना समोर आली आहे.

स्थानकात उभी असणारी (High tension electric wire fell on railway track) रेल्वे तिथून निघाल्यानंतर काही क्षणांत रेल्वेची तार तुटून ट्रॅकवर कोसळल्याची घटना समोर आली आहे.

भिंड, 30 ऑक्टोबर : स्थानकात उभी असणारी (High tension electric wire fell on railway track) रेल्वे तिथून निघाल्यानंतर काही क्षणांत रेल्वेची तार तुटून ट्रॅकवर कोसळल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेची हाय-टेन्शन तार तुटून अचानक ट्रॅकवर येऊन पडल्यामुळे (Dangerous situation) अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. या वायरमधून करंट बाहेर पडत होता आणि अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी (Hundreds of lives saved) प्रसंगावधान राखत या संकटाचा सामना केला आणि अऩेकांचे जीव वाचले.

अशी तुटली तार

मध्यप्रेदशातील भिंड रेल्वे स्टेशनपाशी एका वीजेची तार कोसळली. पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमाराला स्टेशनवरून झाशी लिंक एक्सप्रेस रवाना झाली. त्यानंतर अचानक वीजेची तार कोसळून ट्रॅकवर जाऊन पडली. या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. तिथं उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. हाय टेन्शन असणाऱ्या वीजेच्या तारेतून विद्युत प्रवाह वाहत होता. यामुळे अनेकांना शॉक बसून जीव जाण्याची शक्यता होती.

पुढील ट्रेनची भिती

ही तार ट्रॅकवरून हटवण्याच्या आत जर पुढची ट्रेन तिथं आली, तर रेल्वेतील सर्वांनाच वीजेचा जबर शॉक लागण्याची शक्यता होती. रेल्वेला आग लागून मोठी जीवितहानी होण्याचाही संभव होता. मात्र कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं हा प्रसंग हाताळला.

हे वाचा- 'नरेंद्र भाई केम छो', हे ऐकताच पंतप्रधान मोदी म्हणाले..

वीज केली बंद

वीजेची तार कोसळून त्याचा करंट सर्वत्र पसरत असल्याचं लक्षात येताच रेल्वे स्टेशनवरी कर्मचाऱ्यांनी पुढून येणाऱ्या ट्रेनला थांबवलं आणि पॉवर हाऊसला फोन लावला. त्यानंतर काही मिनिटांतच तिथला विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. त्यामुळे ट्रॅकवरील विद्युत प्रवाह वाहणं बंद झालं. त्यानंतर तातडीनं कर्मचाऱ्यांनी ट्रॅकवरील वायर हटवली आणि मार्ग वाहतुकीसाठी रिकामा करून दिला. कर्मचाऱ्यांनी पहाटेच्या वेळी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. जर ही वायर तुटल्याचं समजलं नसतं आणि त्यावरून पुढील ट्रेन गेली असती, तर अनेकांना वीजेचा धक्का लागून प्राण जाण्याची शक्यता होती.

First published:

Tags: Mp, Railway track, Railway track accident