मराठी बातम्या /बातम्या /देश /एक मुलगी अशीही! आजारी वडिलांना दिले नवे 'जीवन', वयाच्या 17 व्या वर्षी यकृत दान

एक मुलगी अशीही! आजारी वडिलांना दिले नवे 'जीवन', वयाच्या 17 व्या वर्षी यकृत दान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मेनन यांनी देवानंदा यांच्या धाडसाचेही कौतुक केले आणि ती अनेकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kerala, India

कोच्ची, 18 फेब्रुवारी : केरळमधील कोचीमध्ये 17 वर्षीय तरुणीने एक अभिमानास्पद काम केले आहे. केरळ उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर, एका 17 वर्षीय मुलीने यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा एक भाग दान केला आहे.

देशातील अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. याबाबतची माहिती देताना रुग्णालयाने सांगितले की, 9 फेब्रुवारी रोजी राजगिरी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. 2022 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने त्यांना यकृत दान करण्यास मान्यता दिली होती.

मुलीने मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायदा, 2014 च्या कलम 18 अंतर्गत दात्यासाठी विहित केलेल्या वयात सूट मागितली होती. यानंतर केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील देवानंदा यांची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली. न्यायमूर्ती व्हीजी अरुण यांनी 20 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या त्यांच्या आदेशात म्हटले होते की, देवानंदा हिच्या अथक लढ्याला अखेर यश आले हे जाणून आनंद झाला. अल्पवयीन मुलीचे वडील प्रतिश पीजी हे फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते.

हेही वाचा - Success Story: प्रिंसिपलची मुलगी बनली IAS, मुलगा सैन्यदलात, उरी हल्ल्याने बदललं जीवन

रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया राजगिरी रुग्णालयातील मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ रामचंद्रन नारायण मेनन, प्रत्यारोपण सर्जन आणि प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. राजागिरी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि सीईओ फादर जॉन्सन वाझाप्पिल्ली सीएमआय यांनी एका निवेदनात म्हटले की, देवानंदा ही अवयवदानातील एक रोल मॉडल आहे. तसेच मेनन यांनी देवानंदा यांच्या धाडसाचेही कौतुक केले आणि ती अनेकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.

देवानंदासाठी, वडिलांना वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यकृत प्रत्यारोपणाद्वारे खराब झालेले यकृत बदलणे हा होता. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाइकांपैकी केवळ त्यांच्या मुलीचे यकृत जुळल्याचे आढळून आले. देवानंदा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी अवयव दान करण्यास तयार होती. पण तिचे तरुण वय अडथळा ठरत होते. नियमानुसार, अल्पवयीन व्यक्तीला अवयवदान करण्याची परवानगी नाही.

देवानंदाने वैद्यकीयदृष्ट्या दाता होण्यासाठी योग्य असल्यास तिच्याशी प्रौढांप्रमाणे वागण्याचे निर्देश रुग्णालय व्यवस्थापनाला द्यावेत, अशी याचिका दाखल केली होती. यानंतर केरळ स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालाचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या समितीला देवानंद यांच्या प्रकरणाचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Daughter, Father, Kerala