Home /News /national /

'हाय जानू...', या दोन शब्दांनी पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडला ठार करण्यात सुरक्षा दलांना कसं आलं यश?

'हाय जानू...', या दोन शब्दांनी पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडला ठार करण्यात सुरक्षा दलांना कसं आलं यश?

Pulwama Terror Attack and Story Behind Elimination of Mastermind : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack) सुमारे 12 दिवसांनी भारताच्या हवाई हल्ल्याचीही जगभरात चर्चा झाली. यामध्ये भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) लढाऊ विमानांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे पाकिस्तानात (Pakistan) घुसून बॉम्ब फेकले. तेथे बालाकोटमधील (Balakot) दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.

पुढे वाचा ...
    श्रीनगर 14 फेब्रुवारी : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) आहे. या दिवसांत 'हाय जानू', 'हाय जान' सारख्या संदेशांची प्रेमीयुगुलांमध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत आहे. पण सुमारे 3 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ((Jammu-Kashmir) या दिवसापासून सुरू झालेली गोष्ट वेगळी होती. 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांवर हल्ला केला. एका महिन्याच्या आत लष्कर आणि सुरक्षा दलांनी या हल्ल्याचा मास्टर माईंड उमर फारुख अल्वी आणि त्याचा एक साथीदार कामरान याला ठार केले होते. त्यापैकी उमर फारुख हा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मसूद अझहरचा(Masood Azhar) पुतण्या होता. त्याच्या हत्येची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग 'हाय जानू...' असा संदेश पाठल्याने झाला होता. उमर फारुखने पुलवामाच्या एसपींना पाठवला होता संदेश 29 मार्च 2019 ची ती तारीख होती, जेव्हा सुरक्षा दलांनी उमर फारूक आणि कामरान यांना नौगाम जिल्ह्यातील सुथसू कला गावात पहाटे घेरले होते. दहशतवाद्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र, चकमक सुरू झाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत सुरक्षा दलांनी दोघांनाही ठार केले. या संदर्भात न्यूज18 हिंदीला मिळालेल्या माहितीनुसार, 'सुरक्षा दलाच्या या यशात उमर फारूखने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा मोठा हात होता. त्याने हा संदेश पुलवामाच्या (Pulwama) पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) पाठवला होता. त्यात लिहिले होते, हाय जानू.. त्याच्यासोबत पिस्तुलचा इमोजी. त्याने आव्हान दिलेल्या दुसऱ्या संदेशात 'तुझ्या घरात घुसून तुला ठार मारीन' असे लिहिले होते. एसपींनी 'हाय जानू' नावाने नंबर सेव्ह करून त्यावर लक्ष ठेवले पुलवामा एसपीने हे आव्हान स्वीकारले. अनोळखी क्रमांकावरून त्यांना आव्हान आले होते. त्यामुळेच त्यांनी तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये 'हाय जानू' नावाने सेव्ह केला होता. त्यानंतर सायबर सेलकडे त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यादरम्यान तो नंबर बंद असल्याचे समजले. असे असतानाही नंबरचे निरीक्षण थांबवले नाही. महिनाभर तो नंबर निष्क्रीय राहिला. त्यानंतरही सायबर सेल आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क होती. एका रात्री अचानक तो नंबर पुन्हा सक्रिय झाल्याचे कळले. Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल सायबर सेलने तत्काळ वरिष्ठांना सूचना केली. नंबरचे लोकेशन ट्रेस केले गेले, जे नौगामच्या आसपास होते. त्यामुळे सर्व काही निश्चित झाल्यावर ऑपरेशनची तयारी सुरू झाली. त्या नंबरचे लोकेशन शोधत असताना, सुरक्षा दलाचे पथक उमर फारूख त्याच्या साथीदारासह लपलेल्या ठिकाणी पोहोचले. आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सुरक्षा दलांनी त्या दहशतवाद्याला ठार केले. पाकिस्तानी बॉस स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे चिंतेत होते सूत्रांच्यानुसार उमर फारुख स्मार्टफोनचा जास्त वापर करत होता. त्यामुळे पाकिस्तानातील त्याचे हस्तक चिंतेत पडले होते. कारण त्याचा ठावठिकाणा स्मार्ट फोनमुळे सहज समजू शकत होता. झालंही तसंच. त्यामुळे मसूद अझहरचा (Masood Azhar) भाऊ रौफ याने त्याचा स्मार्ट फोन त्वरित नष्ट करण्याचे आदेश दिले. मात्र उमर फारुखने तसे केले नाही. दुसरा फोन नष्ट करतानाचा व्हिडिओ तयार करून तो रौफला पाठवला. प्रशिक्षणात त्याला स्मार्टफोन वापर कमी करणे, ट्रेस होऊ नये म्हणून सिमकार्ड वारंवार बदलणे असं सगळं शिकवूनही त्याने जे करायचं तेच केलं. भारतीय हवाई दलाचा बालाकोटवर हवाई हल्ला पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे 12 दिवसांनी भारताच्या हवाई हल्ल्याचीही (Air Strike) जगभरात चर्चा झाली. यामध्ये भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) लढाऊ विमानांनी 26 फेब्रुवारी 2019 च्या पहाटे पाकिस्तानात (Pakistan) घुसून बॉम्ब फेकले. तेथे बालाकोटमधील (Balakot) दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत 300 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची बातमी होती. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Pulwama Encounter, Terror acttack

    पुढील बातम्या